मुख्यमंत्र्यांची घोषणा ; सोनू सूद महत्वाकांक्षी योजनेचा ब्रँड अम्बेसिडर

शैक्षणिक सुधारणांसाठीब्रँड ॲम्बेसिडर म्हणून अभिनेता सोनू सूद हा काम करणार आहे.
3Sonu_20Sood_3.jpg
3Sonu_20Sood_3.jpg

नवी दिल्ली : कोरोना काळ सुरू झाल्यानंतर मागील वर्षी स्थलांतरित मजुरांना मदत करणाऱ्यांत सोनू सूद Sonu Sood आघाडीवर होता. दिल्ली सरकारने अभिनेता सोनू सूद याच्याशी संपर्क साधला. दिल्ली सरकारने शालेय शिक्षणाबाबत विशेषतः सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याबाबत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. या शाळांचा दर्जा गेल्या काही वर्षांमध्ये सुधारल्याचे पाहायला मिळत आहे. यालाच अनुसरून सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, त्यांच्याशी संवाद साधण्याची या मुलांना संधी मिळावी या दृष्टीने आम आदमी पक्षाच्या सरकारने ‘देश के मेंटॉर’ ही योजना राबविण्याचे ठरवले आहे. 

शैक्षणिक सुधारणांसाठी दिल्ली सरकारच्या ‘देश के मेंटॉर ’या महत्वाकांक्षी योजनेचा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून अभिनेता सोनू सूद हा काम करणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwalयांनी याबाबतची घोषणा केली.

केजरीवाल म्हणाले, ''या योजनेचे रीतसर उद्घाटन होईल आणि त्याचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सोनू सूद काम करेल. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन करेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेले किमान पाच महिने दिल्लीत शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. शैक्षणिक उपक्रम पुन्हा सुरू करण्याची हालचाल आहे. दिल्ली सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीने पुन्हा शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. पुन्हा शाळा सुरू होतील तेव्हा ‘देश के मेंटॉर’ या कार्यक्रमाद्वारे एक नवीन उपक्रम राबवण्याचा सरकारचा मानस आहे.''
 
''सोनू सूद कोरोना काळात अनेक जणांना सक्रिय मदत करत आहे. अनेक सरकारेही जे करु शकली नसती ते सूद याने केले. लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लाखो गरिबांना मदत केली. दिल्ली सरकारच्या आगामी योजनेत त्याच्यामुळे फार मदत होईल,'' असे केजरीवाल यांनी सांगितलं 

पारनेर : राज्य सरकारने नुकतीच गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविली आहे. याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे Anna Hazare यांनी नाराजी व्यक्त केली. घटनेप्रमाणे सर्व मादक पदार्थांवर सरकारला बंदी आणण्याचा अधिकार आहे. मात्र, सरकार जेथे बंदी आहे, त्या ठिकाणची बंदी उठविण्याचे काम करीत आहे. याचा अर्थ, सरकार नशा करण्यास जनतेला प्रोत्साहन देत आहे, अशी टीकाही हजारे यांनी केली.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com