...या राज्यातून येणारे नागरिक 'सुपर स्प्रेडर' ठरू शकतात! - Citizens from this state can be 'super spreaders | Politics Marathi News - Sarkarnama

...या राज्यातून येणारे नागरिक 'सुपर स्प्रेडर' ठरू शकतात!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

कोरोना संक्रमण देशात अक्राळ विक्राळ रुप धारण करताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रातही कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

मुंबई : कोरोना संक्रमण देशात अक्राळ विक्राळ रुप धारण करताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रातही कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर कडक निर्बंध लावण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

सरकारला तब्बल ९० टक्के सवलतीच्या दरात मिळतेय सिरम कडून कोरोना लस 

नांदगावकर यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. ते म्हणाले की ''राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकतात याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे'' असल्याचे नांदवकर यांनी सांगितले आहे.

राज्यात कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशातच इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांची त्यात भर पडत आहे. त्यामुळे राज्यात येणाऱ्या नागरिकांसाठी कडक निर्बंध घालण्याची गरज आहे. तसचे पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातून विविध पक्षाचे कार्यकर्ते गेलेले आहेत. या राज्यांमध्ये प्रचारात कोरोनाचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे या राज्यातून येणारे नागरिक सुपर स्प्रेडर ठरु शकतात. यासाठी राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्याची गरज आहे. 

दक्षिण आफ्रिकेने नाकारली कोरोना लस; 'सिरम'ने परत केले पूर्ण पैसे
 

दरम्यान, सलग तीन दिवसांपासून देशात आढळणाऱ्या रुग्णसंख्येने लाखांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गुरुवारच्या २४ तासांत १ लाख ३१ हजार ८७८ करोनाबाधित रुग्णांची भर पडली तर ८०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात सध्या ९ लाख ७४ हजार २३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख