चित्रा वाघ म्हणाल्या, ''यशोमतीताई, आम्ही तुमच्या सोबत आहोत'' 

मागून देत नसेल तर हिसकावून घ्या. कारण हा प्रश्न तुमचा, माझा नाही.
Sarkarnama (24).jpg
Sarkarnama (24).jpg

मुंबई : 'महिला आयोगाला अध्यक्ष नाही,' या विषयावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ Chitra Wagh यांनी महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांच्यावर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली आहे. ''हा प्रश्न तुमचा, माझा नाही तर महाराष्ट्रातील तमाम महिलांचा आहे. आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत येऊ,'' असे वाघ म्हणाल्या.  

चित्रा वाघ म्हणाल्या, ''यशोमती ताई, तुम्ही राज्यातील महिलांचं मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व करतात. तुम्ही आमची आण बान शान आहात.  मुख्यमंत्र्यांसह तुम्ही तीन मंत्र्यांकडे महिला आयोगाला अध्यक्ष द्या, म्हणून तुम्ही सहा महिन्यापूर्ण फाईल दिली. पण अजूनही त्याच्यावर कार्यवाही झाली नाही. पण तुमच्या मागणीकडे सरकार लक्ष देत नसेल आणि जिथं तुम्हाला आमची गरज वाटेल, त्याठिकाणी आम्ही तुमच्या सोबत आहोत, मागून देत नसेल तर हिसकावून घ्या. कारण हा प्रश्न तुमचा, माझा नाही तर महाराष्ट्रातील तमाम महिलांचा आहे. आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत येऊ.''

पोकळ धमक्यांना घाबरत नाही ; राष्ट्रवादीनं भाजपला खडसावलं
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आम्हाला पाहिजे तशी साथ देत नसल्याचा गंभीर आरोप महिला बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दोन दिवसापूर्वी केला. अकोल्यात एका शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  

ठाकूर म्हणाल्या, की बालसंगोपन निधी अनुदानात कित्येक वर्षापासून वाढले नव्हते. बालसंगोपन निधीच्या माध्यमातून पूर्वी 450 रुपये मिळायचे. ते आम्ही 1 हजार 125 रुपये केले. आता हे अनुदान 2 हजार 500 रुपये करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव पाठवला आहे. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, ते साथ देत नाहीत, असा आरोप ठाकूर यांनी केला होता.   

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com