राणेसाहेब मोठे नेते, ते शिवसेनेला झेपले नाहीत : चित्रा वाघ - Chitra Wagh criticizes Shiv Sena MP Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

राणेसाहेब मोठे नेते, ते शिवसेनेला झेपले नाहीत : चित्रा वाघ

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

मुळात पहिले तुमचा चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे??

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशा देशपातळीवरची खाती सांभाळण्याची आहे, आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Chitra Wagh criticizes Shiv Sena MP Sanjay Raut) 

हे ही वाचा : नाशिकच्या तिघा महिलांनी सांभाळले राज्य देशाचे आरोद्य!

या संदर्भात चित्रा वाघ यांनी ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या की ''संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले, की राणे साहेबांच्या कर्तृत्वाची उंची खुप मोठी आहे. आणि ती वाढत राहणार आहे. म्हणूनच तर शिवसेनेला ते झेपले नाही, असा चिमटा त्यांनी शिवसेनेला काढला आहे. असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूलाही लवकरच मंत्री पद मिळेल जेणे करून आपल्यालाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल.

आपण जे काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बद्दल जे बरळलात. मुळात पहिले तुमचा चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?? ते सांगा. मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी नक्की खुलासा देईन. आपणास एक स्पष्ट सांगायचे आहे.  की संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरे ला कारे करण्याची भाषा पण वापरता येते, अशा इशाराही वाघ यांनी दिला आहे. 

हे ही वाचा : प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांना हटविण्याची ही आहेत खरी कारणे!

काय म्हणाले होते संजय राऊत? 

एका कार्यक्रमात राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. शिक्षणाचा खेळखंडोबा कसा आहे बघा. देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले धर्मेंद्र प्रधान, काल पर्यंत ते पेट्रोल विकत होते. पेट्रोलियम मंत्री होते. या आधी रमेश पोखरीयाल शिक्षण मंत्री होते. ते शाळेतच कधी गेले नव्हते. मात्र, ते शिक्षण मंत्री होते. त्यांच्या आधी स्मृती ईराणी, मॉडेलिंग करायच्या, म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोक आपले शिक्षण खाते सांभाळायचे. म्हणून तो चित्रपट आला होता. शिक्षणाचा आयचा घो, असे राऊत म्हणाले होते.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख