मिटकरी भावा माझे आणि पवारांचे संबंध त्यांनाच विचार  - Chitra Wagh criticizes Amol Mitkari | Politics Marathi News - Sarkarnama

मिटकरी भावा माझे आणि पवारांचे संबंध त्यांनाच विचार 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 मार्च 2021

वाघ यांनी सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. फोटो मॉर्फिंग प्रकरणी त्यांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुंबई : सिंहाच्या तालमीतील वाघ केवळ नावापुरते उरले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली होती. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले. मिटकरी भावा, माझे आणि माझ्या बापाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार, असे वाघ यांनी सुनावले. 

वाघ यांनी सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेतली. फोटो मॉर्फिंग प्रकरणी त्यांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

''अमोल मिटकरी आता आला आहे. माझ्या भावा, तुला काय माहिती? तुला आमदारकी दिली आहे पक्षाने, नेटाने काम कर. चांगला आवाज आहे बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील. यावर बोलून फार महत्त्व देण्याची गरज नाही'', असे चित्रा वाघ म्हणाल्या.

अमोल मिटकरी काय म्हणाले होते. 

अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते की, ''वाघाची डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळीसुद्धा हवेत कशी विरून जाते, हेही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते'' अशी खोचक टीका त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली होती. 

...तो पर्यंत शेतकऱ्यांची वीज कापणार नाही-अजित पवारांची ग्वाही

 

राजकारणात काय कुठल्याही क्षेत्रात महिलांसाठी रेड कार्पेट नाही, कधीही नव्हते. मला राजकारणात जे जे काही समजले, ते मी शिकले आणि मी त्यानुसार काम करते. २० वर्ष मी राष्ट्रवादीत काम केले. पहिल्या दिवसापासून मी सदस्य होते. मंत्रिपद कधी डोक्यात नव्हते. मी माझे काम करत राहते. माझ्या मागे राजकारणाचा इतिहास-भूगोल नसून, मी सर्वसाधारण घरातील आहे. आमच्या घरात कोणी साधे ग्रामपंचायत सदस्यही नाही. माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यंत काम करणार असे चित्रा वाघ यांनी सांगितले.  

काॅंग्रेस नेत्यांमध्ये जुंपली: निवडणुकीतील आघाडीवरुन ज्येष्ठ नेत्याचे टीकास्त्र
 

पवारांविषयी काय म्हणाल्या होत्या वाघ?

मला आज पवार साहेबांची आठवण येते, साहेब मला तुमची खूप आठवण येते. ५ जुलैला गुन्हा दाखल झाला, मला चांगले आठवते आणि (ता.७ जुलै २०१७) ला मी साहेबांकडे गेले होते, सिल्व्हर ओकला बोलावले होते त्यांनी. माझा बापच आहे. त्यांनी बोलावून घेतले मला, आणि मी एफआयआरची कॉपी त्यांना दिली, पंचनाम्याची कॉपी मी दिली. साहेबांनी सगळे वाचले, म्हणाले चित्रा याच्यात तुझा नवरा कुठेच नाहीये. मी म्हटले साहेब हेच आहे''. अशी आठवण चित्रा वाघ यांनी सांगितली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख