धक्कादायक : चीनने केली होती मुंबईची बत्ती गुल...

मागील वर्षी अॉक्टोबर महिन्यात संपूर्ण मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाला होता.
China targeted power facilities in mumbai cause massive power outage
China targeted power facilities in mumbai cause massive power outage

नवी दिल्ली : मागील वर्षी अॉक्टोबर महिन्यात संपूर्ण मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. फटका सर्वच क्षेत्राला बसला. या बत्ती गुलमागे चीनचा हात असल्याचा दावा केला जात आहे. चीनकडून सायबर हल्ला करून भारतातील वीज पुरवठा यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर विभागाला याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 

अमेरिकेतील न्युयॉर्क टाईम्स या वृत्तसंस्थेने एका अभ्यासाच्या आधारे हा दावा केला आहे. चीनमधील रेडइको या समूहाने भारतातील वीज पुरवठा यंत्रणेला लक्ष्य केले होते. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत व चीनमधील तणाव वाढला होता. त्यावेळी 20 भारतीय जवान शहीद झाले होते. याच कालावधीत चीनकडून या यंत्रणेत मालवेअर सोडण्यात येत होते.

अमेरिकेतील रिकॉर्डेड फ्यूचर या कंपनीकडून सरकारी यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या इंटरनेटच्या वापराबाबतचा अभ्यास केला जातो. त्यांनी केलेल्या अभ्यासातून ही गंभीर बाब समोर आली आहे. भारतातील पॉवर ग्रीडला लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांच्या अहवाल स्पष्ट कऱण्यात आले आहे. या काळात चीनच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळेच वीज पुरवठा खंडित झाला असावा, असा दावाही त्यात करण्यात आला आहे.  

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी राज्याच्या सायबर विभागाकडून याबाबत अहवाल तातडीने मागविला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही याला दुजोरा दिला. हा घातपात असल्याचे आपण त्यावेळीच म्हटले होते. पण काहींनी त्यावर विश्वास ठेवला नाही. आता या अभ्यासामुळे हा घातपातच असल्याचे सिध्द झाल्याचे राऊत म्हणाले. 

दरम्यान, मागील वर्षी 12 अॉक्टोबर रोजी संपूर्ण मुंबईला वीजेअभावी मोठा फटका बसला आणि विशेषत: कोरोनाच्या कालखंडात तर हा फटका आणखी गंभीर बनला. रेल्वे, दवाखाने, पाणीपुरवठा अशा सर्वच सुविधा काही काळ ठप्प पडल्या होत्या. त्यावेळी केंद्रीय ऊर्जाखात्याने आजच्या वीजबंदविषयी सांगितले की, मुंबईतील दोन हजार मेगावॉट वीज अचानक गायब झाली होती. राष्ट्रीय ग्रीड चांगले असून राज्याला पुरवठा करणाऱ्या ग्रीडमध्ये समस्या निर्माण झाल्याने मुंबईची वीज गायब झाली होती. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com