कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता राज्यभर जाहीराती द्या: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकास कामांचा आढावा घेतला.
chief minister udhhav thackrey instructed about human resources
chief minister udhhav thackrey instructed about human resources

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी लागणारे कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता राज्यभर जाहीराती द्या. ज्या विभागात रोजगार उपलब्ध आहे त्याचा तपशील घेऊन या जाहिराती केल्यास भूमीपुत्रांना रोजगाराची माहिती होईल आणि त्यांना रोजगारही मिळेल. भूमिपुत्रांना या कामांसाठी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा, असे निर्देश देतानाच पावसाळ्यात या विकासकामांमुळे महानगरांत पुर परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी मंत्रालयात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, संजय बनसोड, मुख्य अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन झाले. आता मुंबई महानगर परिसर, पुणे वगळता राज्यात अन्य ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत. मात्र मजुरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. परराज्यातील मजूर त्यांच्या गावी गेले आहेत. ते जेव्हा परत येतील तोपर्यंत त्यांच्यावर विसंबून न राहता विकास कामांसाठी लागणारे कुशल, अकुशल कर्मचारी, मजूर यांची विभागवार यादी करा. त्याचबरोबर कोणत्या विभागात रोजगार उपलब्ध आहे याचाही तपशील घ्या आणि राज्यभर कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी जाहीराती द्या. खास करून जेथे जेथे मेट्रोचे कामं सुरू आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर जाहीराती द्या. त्यामुळे राज्यातील भुमीपुत्रांना रोजगार मिळेल. सुरूवातीच्या काळात या भूमिपुत्रांना काही काळ प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या समनव्ययातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकास कामे करतांना त्याचा प्राधान्यक्रम ठरवा असेही त्यांनी सांगितले. पावसाळा सुरू होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी सुरू असलेली विकास कामे बंद आहेत. अशा वेळी प्रमुख शहरांमध्ये कुठलीही अडचण, पुरस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तातडीने डेब्रीज उचलणे, ड्रेनेज पाईप दुरुस्ती करणे आदी कामांवर लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, नाशिक मेट्रोबाबत सादरीकरण करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com