मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारलं ; भाजपसह वारकऱ्यांचा विरोध  - Chief Minister Uddhav ThackerayPandharpur Ashadi Maha Puja | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारलं ; भाजपसह वारकऱ्यांचा विरोध 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

पंढरपुरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पंढरपूर : आषाढीचा सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरा केला जाणार आहे. मानाच्या दहा पालख्यातील ४०० भाविकांना वारीसाठी पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. सर्व प्रथा आणि परंपराचे जतन करत यंदाचा आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जाणार आहे Ashadi Maha Puja

येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. दोन वर्षापासून राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून राज्य सरकारने आषाढी पायी पालखी सोहळा व पंढरपूरची यात्रा रद्द केली.  

आषाढीची श्री विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा Ashadi Maha Puja मुख्यमंत्री उध्दव ठाकरे . Chief Minister Uddhav Thackeray यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. मंदिर समितीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची  मुंबईत भेट घेवून निमंत्रण दिले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंदीर समितीच्या या  निमंत्रणाचा नम्रपणे स्विकार करत  महापूजेसाठी पंढरपूरला येणार असल्याचे सांगितले, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. महापूजेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे १९ जुलै रोजी पंढरपुरात मुक्कामी येणार आहेत.

 मोठा पोलिस बंदोबस्त

मुख्यमंत्र्यांना महापूजेला भाजपसह विविध वारकरी संघटनांनी विरोध केला आहे. या या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर समितीने आषाढीची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंदिरात संत कान्होपात्रा समाधी जवळ तरटीच्या रोपाची लागवड केली जाणार असल्याचे ही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य संभाजी शिंदे,ज्ञानेश्वर महाराज जळगाकर आदी उपस्थित होते.

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख