पंतप्रधानांनाच्या भेटीआधी मुख्यमंत्री शरद पवारांशी चर्चा करणार 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा काढणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.
 Uddhav Thackeray, Sharad Pawar .jpg
Uddhav Thackeray, Sharad Pawar .jpg

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा काढणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याआधी मुख्यमंत्री ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर त्यांची भेट होणार आहे. या भेटीमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Chief Minister Uddhav Thackeray will meet Sharad Pawar)

उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तौते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान याची भेट होणार असून या क्रायक्रमाची रुपरेषा पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. 

मराठा आणि ओबीसी आरक्षणसंदर्भातील बैठकीला अन्न व पुरवठा मंत्री मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिले होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

रविवारी शिवराज्यभिषेकदिनी संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली. येत्या 16 जूनपासून राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे महाविकासआघाडीने पुन्हा एकदा हा चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला आहे.

संभाजीराजे म्हणाले की, "मी 2007 पासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य पिंजून काढले आहे. माझा लढा हा 70 टक्के गरीब मराठा समाजासाठी आहे. मराठा समाज हा सामाजिक मागास नाही, म्हणून आरक्षण देता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. कोण चुकले कोण बरोबर याच्यावरुन मागचे सरकार आणि आताचे सरकार यांच्यात वाद सुरु आहे. या वादाशी आम्हाला काही घेणे-देणे नाही, मराठा समाजाला आरक्षण कसे देणार ते सांगा.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com