मुख्यमंत्री चिपळून दोऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी 

चिपळूण येथे मदत व बचाव कार्याची पाहणी करणार आहेत.
 Chief Minister Uddhav Thackeray .jpg
Chief Minister Uddhav Thackeray .jpg

मुंबई : ढगफूटी झाल्यामुळे चिपळून शहराला पूराचा वेढा पडला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे आज सकाळी मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणसाठी रवाना होणार आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होणार आहेत. चिपळूण येथे मदत व बचाव कार्याची पाहणी करणार आहेत. (Chief Minister Uddhav Thackeray will inspect the flood-hit area in Chiplun today) 
 
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड येथे पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. महाड येथील तळीये गावात दरड कोसळून 44 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तेथे ठाकरे पोहोचले होते. डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली. 

आजकाल पावसाळ्याची सुरुवातही चक्रीवादळाने होते. अशा घटना पाहता डोंगर- उतार व कडे-कपाऱ्यांतील वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी जल आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारतर्फे गावकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल तसेच त्यांचे पुनर्वसन केले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. गावकऱ्यांनी काळजी करू नये, अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला.

मागील आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या पावसाने राज्यभरात हाहा:कार माजवला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्त हानी झाली आहे. एकंदरीतच संपूर्ण राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पूर, दरड कोसळणे आणि इतर दुर्घटनांमुळे राज्यात जवळपास १०० लोकांना जीव गमवावा लागला आहे. अनेक जण दरडीमुळे कोसळलेल्या घरांखाली व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेले आहेत. तर शेकडो जण बेपत्ता झाले आहेत. या पावसाने माणसांचा तर जीव घेतलाच सोबत मुक्या प्राण्यांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे.शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या संकटाचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांसाठी उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आपत्तीग्रस्तांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगत दुघटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com