सचिन वाझे आणि शिवसेनेचा आता काही संबंध नाही

मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.
 Chief Minister Uddhav Thackeray Secretary Waze .jpg
Chief Minister Uddhav Thackeray Secretary Waze .jpg

मुंबई : मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, ही पद्धत तपासाची पद्धत नाही. कुणीही तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचे आणि त्याला आयुष्यातून उठवायचे अशी पद्धत सध्या सुरू आहे. सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्र तयार केले जात आहे. ते कशासाठी?, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सचिव वाझे २००८ मध्ये शिवसेनेत होते, त्यानंतर त्यांचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न 

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अधिवेशन घेणे कोरोनात आव्हानात्मक होते. पण, नियम पाळून अधिवेशन घेतले. विरोधकांनीही उत्तम सहकार्य केले. आव्हानात्मक स्थिती असतानाही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तरीही रडगाणे न गाता महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही, हे आपले ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार सर्व घटकांना सामावून घेण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. 

सीडीआर मिळवला ती गंभीर बाब 

ठाकरे म्हणाले, फडणवीस यांनी सीडीआर मिळवला ती बाब अत्यंत गंभीर आहे. सिडीआर द्या असे आम्ही त्यांना सांगितले आहे. सीडीआर हा तपास यंत्रणेचा भाग आहे. सचिव वाझे आमचा मंत्री नाही. कारण नसताना एखाद्याला धरायचे, त्यांनी एकाला बेड्या टाकाल्या म्हणून त्यांना अडकवता का? असा सवालही त्यांनी विरोधकांना केला. त्याच बरोबर खासदार मोहन डेलकर यांचे कुटुंबीय काल भेटले. त्या नंतर गुन्हा दाखल केला आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असून त्यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत. त्याचाही तपास सुरू आहे.

पीकविमा योजनेत सुधारणेची गरज  

पीकविम्या संदर्भातील निती आयोगाच्या बैठकीत आम्ही भूमिका मांडली होती. पीकविमा योजना केंद्राच्या आखत्यारीत आहे. त्यामध्ये आणखी सुधारणा होण्याची गरज आहे. केंद्र सरकारने काही नियम बदलले आहेत. त्यामुळे या वर्षी जास्त फायदा हा विमा कंपन्यांनाच झाला आहे. पूर्वी जसे नियम होते तसेच नियम ठेवावेत. केंद्राचे सरकार सातत्याने सांगते की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मात्र, करत काहीच नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कृषीमंत्री विविक भुसे यांच्या नेतृत्वाखाली केळी पिकासाठी समती स्थापन करु असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  
 
सचिन वाझे यांची बदली का केली? त्यावर अजित पवार म्हणाले की, सचिन वाझे यांची बदली केल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सभागृहाचे कामकाज व्यवस्थीत चालवे म्हणून त्यांची बदली केली गेली. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्या नंतर तो निर्णय घेण्यात आला. 

विधानसभा अध्यक्ष निवड
 
 काँग्रेस पक्षाचे नेते पत्रकार परिषदेत उपस्थित नाही, यावर प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात. विधानसभेचा अध्यक्ष आम्ही तीनही पक्ष ठरवू त्यावेळी निवडीची तारीख जाहीर करु.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com