स्वप्नील लोकणकरांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन, हे दिले आश्वासन

शिवसेनेच्या वतीने आज शिवसेना मदत निधी अंतर्गत लोणकर कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत दिली. तसेच काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि आमदारतानाजी सावंत यांनी लोणकर कुटुंबायांना ११ लाख रुपयांची मदत केली आहे.
Uddhav Thackrey.jpg
Uddhav Thackrey.jpg

मुंबई : स्वप्नील लोणकरची (Swapnil Lonkar) आत्महत्येची घटना दुर्देवी आहे, पण तुम्ही धीराने घ्या. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना दिला. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला तिच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळवून देण्याचे आश्वासनही ठाकरे यांनी दिले. (The Chief Minister offered condolences to the family of Swapnil Lokankar)

एमपीएससीची परिक्षा पास होऊन दोन वर्षे झाल्यानंतरही नियुक्ती नसल्याने आलेल्या नैराश्यापोटी स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्वप्नीलचे आई, वडिल आणि बहिण यांनी भेट घेतली. या वेळी ठाकरे यांनी लोणकर कुटुंबियांचे सांत्वन केले. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, अशा शब्दात त्यांनी धीर दिला.
याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.

डॉ. निलम गोऱ्हे यांनी आयडीएफसी बॅंकेचे १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज फेडले, शिवसेना मदत निधीतून ५ लाख लोणकर यांच्या कुटुंबावर आयडीएफसी बँकेचे उदरनिर्वाहसाठी काढलेले कर्ज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पूर्ण रक्कम भरून कर्ज बेबाक केले. त्याचबरोबर स्वप्नीलची बहीण पूजा हिला नोकरी देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी सांगितले.

शिवसेनेच्या वतीने आज शिवसेना मदत निधी अंतर्गत लोणकर कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत दिली. तसेच काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि आमदार तानाजी सावंत यांनी लोणकर कुटुंबायांना ११ लाख रुपयांची मदत केली आहे.

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com