आंबेडकर जयंतीच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी लॅाकडाउन जाहीर केला...रामदास आठवलेंची नाराजी. - Chief Minister announce the lockdown on the day of Ambedkar birth anniversary Ramdash Athavale  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आंबेडकर जयंतीच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी लॅाकडाउन जाहीर केला...रामदास आठवलेंची नाराजी.

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशीच लॉकडाउन लावणे योग्य नव्हते, असे रामदास आठवले म्हणाले.

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशीच  राज्यात लॉकडाउन लावल्यामुळे आंबेडकरी जनतेत गैरसमज आणि नाराजी आहे.  ता.14 एप्रिल ऐवजी 15 एप्रिलला जरी लॉकडाऊन लावला असता तर  फार उशीर झाला नसता.   14 एप्रिलला लॉकडाउन लावणे योग्य नव्हते, असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. 

  
आज सकाळी 11 वाजता  रामदास आठवले यांनी चैत्यभूमी दादर येथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यास  अभिवादन केले. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी भीम जयंती दिवशीच लॉकडाउन लावणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी आंबेडकरी जनता सर्व निर्बंध नियम पाळत आहे. गेल्या वर्षी ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही शांततेत साजरी केली. यावर्षी ही कोरोना बाबतचे निर्बंध आंबेडकरी जनता पाळत आहे. मात्र लॉकडाउन मुख्यमंत्र्यांनी नेमका 14 एप्रिलला भीमजयंतीलाच का जाहीर केला ? असा सवाल आठवले यांनी विचारला आहे.

हेही वाचा : संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली...
 
मुंबई : राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाउन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले. पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रती कुटुंब १०५ रुपयांचाच भार सोसलेला आहे. रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख