चेंबूर दुर्घटना : मृतांच्या वारसांना राज्य सरकारची ५ लाखांची तर केंद्राची २ लाखाची मदत जाहीर 

मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी जाहीर केले आहे.
 State government announces Rs 5 lakh assistance to heirs of deceased .jpg
State government announces Rs 5 lakh assistance to heirs of deceased .jpg

मुंबई : मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटने संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलिस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. (Chembur ; State government announces Rs 5 lakh assistance to heirs of deceased) 

मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी जाहीर केले आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे. मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. आजही पाउस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी पातळी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना स्थलांतरित करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे.

पावसामुळे जिथे जिथे पाणी साचले आहे त्याठिकाणी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करावी, रस्ते मोकळे करावेत, वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. मात्र, लवकरात लवकर ती सुरळीत होईल असे पाहावे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील रेल्वे वाहतूक कशी पूर्ववत होईल हे बघण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या. 

दरम्यान, मुंबईमध्ये चेंबूरमध्ये पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे दरड भिंतीवर कोसळल्यामुळे ही भिंतच घरांवर कोसळली. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा अकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

या घटनेत आत्तापर्यंत ६ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited By - Amol Jaybhaye 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com