आत्ता निवडणुका घेतल्या तरी पंतप्रधान मोदी 400 जागा पार करतील! चंद्रकांत पाटलांचा दावा

देशातील कोरोना संकटावरून काँग्रेसकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनालक्ष्य केलं जात आहे.
Chandrakant Patil slams congress over alligations on Pm Narendra Modi
Chandrakant Patil slams congress over alligations on Pm Narendra Modi

मुंबई : देशातील कोरोना संकटावरून काँग्रेसकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) लक्ष्य केलं जात आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्यानेच देशातील लोकांना भयानक संकटाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, (Rahul Gandhi) प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींवर टीका केली जात आहे. राज्यातील नेत्यांकडूनही मोदी सरकारला जबाबदार धरले जात आहे. (Chandrakant Patil slams congress over alligations on Pm Narendra Modi)

राज्यात पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी दुरूस्त करून दाखवावेत, असे आव्हान काँग्रेसनं दिलं आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना काँग्रेसवर टीका केली ते म्हणाले, ''व्हेंटिलेटरबाबत आताच का तक्रार केली जात आहे. एवढे दिवस तक्रारी आल्या नाहीत. ही सगळी राज्य शासनाची चूक आहे. महाविकास आघाडी सरकारचे हे अपयश आहे. काँग्रेसला मी सांगतो, आज जरी निवडणुका झाल्या तरीही पंतप्रधान मोदी 400 जागा पार करतील,'' असा दावा पाटील यांनी केला. तसेच देशाच्या पंतप्रधानांचा मान राखा, अपमान करू नका, असंही काँग्रेसला सुनावलं.

मराठा आंदोलनात सहभागी होणार

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यातील संघटना आक्रमक झाल्या आहेत. भाजपने मराठा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. पाटील म्हणाले, मराठा आंदोलन सरकारला झेपणार नाही. मराठा आता शांत बसणार नाही. आम्ही झेंडा न घेता आंदोलनात सहभागी होऊ. आरक्षणासाठी मोर्चा ल‌ॅाकडाऊननंतर निघाला तर आमचा पाठिंबा असेल. आरक्षण मिळवायचं आहे. सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. आम्ही आरक्षण दिलं तेव्हा भुजबळ तोंडावर पडले. म्हणून आता हे घोळ घालतात. आरक्षणाबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं पाटील यांनी सांगितलं. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामीचा काँग्रेसचा डाव

काँग्रेस पक्षाने कोरोनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करून मोदी सरकारला अडचणीत आणण्याची प्रचार योजना आखल्याचे उघडकीस आले आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संघर्ष करत असताना अशा प्रकारे देशाच्या विरोधात काम करणे निषेधार्ह आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.

सोशल मीडियाच्या जगात ज्याला टूलकिट म्हणतात असे काँग्रेस पक्षाचे एक सूचनापत्र उघडकीस आले आहे. त्यामध्ये मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी काय काय करावे याच्या सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राजकीय विरोधासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करण्यापर्यंत काँग्रेस गेली. तसेच कोरोनाच्या प्रसाराबाबतही हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करून निवडक टीका करण्याचे डावपेच काँग्रेसने आखल्याचे उघड झाले आहे. हे धक्कादायक आणि निंदनीय आहे. या सर्व प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com