फुग्याला भोक तुमच्या पडलंय ; चंद्रकांतदादांचा राऊतांवर पलटवार

भाजप मनामध्ये खुन्नस ठेऊन काम करीत नाही.
फुग्याला भोक तुमच्या पडलंय ; चंद्रकांतदादांचा राऊतांवर पलटवार
1Sarkarnama_20Banner_20_202021_04_19T173102.562.jpg

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाचे Narayan Rane controversy समर्थन केलं होतं. आज सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

''राणे यांनी महाराष्ट्राला लाथ मारली व त्यांचे नवे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील राणेंच्या बेताल वक्तव्याचे Narayan Rane controversy समर्थन करीत आहेत. राणे यांना तसे बोलायचे नव्हते, अशी मखलाशी करु लागले आहेत. फडणवीस-पाटील यांच्या गळ्यात राणे नावाचा फाटका फुगा अडकला आहे. त्यामुळे सांगता येत नाही, सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे," असा टोमणा शिवसेनेने भाजपला लगावला आहे.त्याला चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''एखादी गोष्ट चुकली तर राणेंना आणि त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी व्यवस्था आहे. राणेंचं वाक्य चुकलं नाही.  थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद असतो. भाजप मनामध्ये खुन्नस ठेऊन काम करीत नाही. राऊत साहेब तुमच्यावर पण आरोप झालेत, त्यावर पण बघा. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललंय. फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे, मी 'सामना'ला किंमत देत नाही.''

''काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झालं आहे. आता राणेंना जामीन मिळाला आहे.  सत्याचा विजय झाला आहे.  सरकार सारखे कोर्टाच्या थपडा खात आहे. काल राणे जेवत असताना ताट हिसकावून घेत त्यांना अटक केली. हा प्रकार अमानवी आहे. राणेंची तब्बेत खराब झाली आहे. त्यामुळे एक दिवस ते आराम करणार असून लवकरच जन आशीर्वाद यात्रा निघेल,'' असे पाटील म्हणाले. 

फडणवीस-पाटील यांच्या गळ्यात राणे नावाचा फाटका फुगा अडकला 
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांना काल पोलिसांनी अटक केली, रात्री उशीरा त्यांना जामीन मंजूर झाला. काल भाजप-शिवसेना यांच्यात राडा झाला. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाजपवर निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. 
Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in