रेमडेसिविरच्या साठेबाजीमुळे चंद्रकांत पाटलांचा मोबाईल नंबर केला व्हायरल.... - Chandrakant Patil mobile number goes viral due to Remedicivir Gujarat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

रेमडेसिविरच्या साठेबाजीमुळे चंद्रकांत पाटलांचा मोबाईल नंबर केला व्हायरल....

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 एप्रिल 2021

रेमडेसिविर इंजेक्शनावरून गुजरातमध्ये राजकारण तापलं आहे.

सुरत : देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णालयात दाखल होणारे रुग्णही वाढल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीही वेगाने वाढत आहे. परिणामी, देशात अनेक ठिकाणी रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे.  रेमडेसिविर इंजेक्शनावरून गुजरातमध्ये राजकारण तापलं आहे. 

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी पाच हजार इंजेक्शन मोफत वाटले याची सध्या चर्चा  आहे. याबाबत कॅाग्रेसचे नेते अर्जुन मोढवाडिया यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टि्वट करुन सी.आर. पाटील यांच्याकडे पाच हजार इंजेक्शन कसे आले, असा सवाल उपस्थित केला आहे. 'हे राजकारण नाही तर गुन्हा आहे,' असे  अर्जुन मोढवाडिया म्हणाले. 

याबाबत एका पत्रकाराने मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना विचारले असता ते म्हणाले की मला या इंजेक्शनबाबत माहित नाही. मी त्यांना इंजेक्शन दिले नाहीत. त्यांना ही इंजेक्शन कसे मिळाले, हे त्यांनाच विचारा.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी काही दिवसापूर्वी सांगितले की भाजप कार्यालयात पाच हजार  रेमडेसिविर इंजेक्शन मोफत वाटण्यात येणार असून  कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनी ते मोफत देण्यात येत आहे. याबाबत त्यांनी एक छायाचित्र प्रसिद्ध केलं होते.  यावरुन पत्रकारांनी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना विचारले की राज्यात इंजेक्शनचा तुटवडा आहे, तर दुसरीकडे भाजप अध्यक्ष मोफत इंजेक्शन वाटप आहेत. यावर मुख्यमंत्री विजय रूपाणी म्हणाले, ''आम्ही त्यांना एकही इंजेक्शन दिलेले नाही. त्यानांच विचारा ही इंजेक्शन कोठून मिळाली?

यावर सी.आर.पाटील म्हणाले, ''मी हि इंजेक्शन 'मॅनेज' केली आहेत.'' यावरून कॅाग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरातमधील एका प्रसिद्ध दैनिकाने याबाबतचे वृत्त देऊन सी.आर. पाटील यांचा मोबाइल क्रमांक (98241-27694) ठळक अक्षरात प्रसिद्ध केला आहे. 

रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आज या इंजेक्शनसह त्यातील घटकांची निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. देशात दर महिन्याला 38 लाख 80 हजार इंजेक्शन उत्पादित करण्याची औषध कंपन्यांची क्षमता आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळेल, यादृष्टीने पावले टाकली जात असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे.  

रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर सर्व वितरकांची माहिती प्रसिध्द करण्यास सांगण्यात आले आहे. रुग्णालये व कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना ही माहिती उपलब्ध होऊ शकेल. ही माहिती शासकीय व खासगी रुग्णालयांपर्यंत पोहचवावी, अशा सुचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. औषध निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी साठा आणि वितरणाबाबतची तपासणी करावी. तसेच इंजेक्शनच्या काळाबाजारावरही लक्ष ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्याबाबत सर्व कंपन्यांना सांगण्यात येणार आहे. याबाबत केंद्राकडून पावले टाकण्यात आली आहेत. 

Edited by: Mangesh Mahale 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख