न्यायमूर्ती चांदीवाल समितीनं परमबीर सिंग यांना  ठोठावला २५ हजारांचा दंड

तीन दिवसांत ही रक्कम मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडामध्ये जमा करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
343Mumbai_20CP_20Parambir_20Singh_0.jpg
343Mumbai_20CP_20Parambir_20Singh_0.jpg

मुंबई : न्यायमूर्ती चांदीवाल समितीनं   Justice Chandiwal Committee माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  Parambir Sing यांना  २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चांदीवाल चौकशी समितीसमोर परमबीर सिंह अनुपस्थितीत राहिल्यानं समितीनं त्यांच्यावर ही  कारवाई केली आहे. तीन दिवसांत ही रक्कम मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडामध्ये जमा करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

२५ ऑगस्टला समितीची पुढची सुनावणी होणार आहे. चांदीवाल समितीसमोर हजर राहण्यासाठी परमबीर सिंह यांना शेवटची संधी देण्यात आली. यापूर्वीही जून महिन्यात माजी मुंबई पोलीस आयुक्त व राज्याचे गृह खात्याचे प्रमुख परमबीर सिंग यांना चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे दंड बजावण्यात आलेला आहे. परमबीर सिंग यांना चौकशी समितीचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आला होता. 

पार्थ पवार यांच्या मावसभावावर दगडफेक
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी शंभर कोटी वसुली प्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. न्यायमूर्ती चांदीवाल म्हणाले की परमबीर सिंग यांना समितीकडून २५ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी शेवटची संधी देण्यात येत आहे. तसेच १८ ऑगस्टपूर्वी त्यांना गैरहजर राहिल्याबद्दल २५ हजार रुपयांची दंडाची रक्कम मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडमध्ये जमा करावे लागतील.

“वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर चौकशी निश्चित वेळेत पूर्ण होणे महत्वाचे आहे. ३० जुलैच्या आदेशामध्ये चौकशीला उशीर का होत आहे.  याबाबत विचारणा करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्यामुळे चौकशी रखडता कामा नये. दोन्ही पक्षकारांनी चौकशी समितीच्या वेळापत्रकाचे पालन करणे आवश्यक आहे,'' असे समितीने म्हटलं आहे. 

परमबीर सिंग यांनी न्यायमूर्ती चांदीवाल समिती आणि समितीने पाठविलेल्या समन्सला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती परमबीर सिंग यांचे वकील संजय जैन आणि अनुकुल सेठ यांनी समितीला दिली. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर २३ ऑगस्टला उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे सांगून समितीच्या सुनावणीला स्थगिती मागितली. त्यांनी समितीची सुनावणी २३ तारेखच्या पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
Edited by : Mangesh Mahale 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com