जेव्हा गडकरी, फडणवीस अन् जंयत पाटील एकत्रित येतात...

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आज दिल्लीत एकत्र आले. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेली ही बैठक तब्बल दोन तास चालली.
Central Minister Nitin Gadkari meets jayant patil and Devendra Fadanvis meet in delhi
Central Minister Nitin Gadkari meets jayant patil and Devendra Fadanvis meet in delhi

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आज दिल्लीत एकत्र आले. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेली ही बैठक तब्बल दोन तास चालली. या बैठकीत राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्पांसह पुण्यातील मुळा-मुठा व नागपूरच्या नाग नदीच्या खोलीकरण, सौंदर्यीकरण व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांवर सकारात्मक चर्चा झाली. 

राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. रखडलेल्या प्रकल्पांमध्ये महत्वाचा असलेला गोसीखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत मार्गी लावण्यासाठी आर्थिक सहाय करण्याची भूमिकाही केंद्र सरकारने घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीनंतर दिली.

राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पुढच्या दीड ते दोन वर्षांत पूर्ण न झाल्यास त्यांना केंद्राकडून निधी मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे राज्याकडून विनाविलंब आवश्यक पुर्तता करावी, अशी सूचना गडकरी यांनी केली. तसेच राज्यांना केंद्राकडून मिळणारा निधी थेट महापालिकांना दिल्यास तीन-चार महिन्यांचा कालावधी वाचेल, असेही गडकरी म्हणाले. 

गडकरी म्हणाले की, यमुनेवरील प्रकल्पाच्या धर्तीवर मुळा मुठा व नाग नद्यांच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांतून निघणाऱ्या शुद्ध पाण्याची विक्री करण्याबाबत विचार करता येईल. पुणे व नागपूरमधील नदी शुद्धीकरण, सौंदर्यीकरण प्रकल्पांना ‘जायका’ या जपानी कंपनीकडून कर्जपुरवठा होणार आहे. संबंधितांना या प्रस्तावावर विचार कऱण्याची सुचना केली आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट व सुभाष भामरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

या मुद्यांवरही झाली चर्चा...

गोसीखुर्द, सुरवाडे, दिघाव, म्हैसाळा, टेंभू यासारख्या रखडलेल्या सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच्या कालमर्यादेवरही बैठकीत विस्ताराने चर्चा झाली. गोसी खुर्द प्रकल्पासाठी पुढील तीन वर्षांत प्रत्येकी १५०० कोटींचे अर्थसाह्य उपलब्ध व्हावे, याबावरही बैठकीत काही मुद्दे मांडण्यात आले. ५० टक्के काम पूर्ण झालेल्या व तरीही गेली १२ -१५ वर्षे ते रखडलेल्या असे प्रकल्पांच्या तांत्रिक बाबी पुर्ण करून अर्थसहाय्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com