मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब..कोरोना संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करा.. - central government should declared corona national calamity  sanjay raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब..कोरोना संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करा..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

सुप्रीम कोर्टानेही कोरोना महामारी हे राष्ट्रीय संकट असल्याचे म्हटलं आहे.

मुंबई : ''कोरोनाची आजची परिस्थिती हे एक राष्ट्रीय संकट आहे. यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे संकट हे राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करा, असे सांगितले आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले. आता सुप्रीम कोर्टानेही कोरोना महामारी हे राष्ट्रीय संकट असल्याचे म्हटलं असून मुख्यमंत्र्याच्या सूचनेवर शिक्कामोर्तब केलं आहे,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 'केंद्र सरकारने कोरोना महामारी ही आता राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी,' अशी मागणी राऊत यांनी जाहीर केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना नेहमीच सांगितलं की कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा. आज न्यायालयानं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाचे आभारी आहोत.

"महाराष्ट्राला बदनाम करण्याचं खूप काम करण्यात आलं. पण कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राने सर्वात चांगलं काम केलं आहे. त्याची दखल आज ना उद्या न्यायालय घेईल," असे राऊत म्हणाले.  "कोरोनामुळे जनता भयभयीत झाली आहे. त्या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी देशाला महाराष्ट्र मॅाडेलप्रमाणेच काम करावं लागेल," असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. "कोरोना आता न्यायालयापर्यंत गेला आहे, त्यामुळे न्यायालय सक्रिय झाले आहे," असेही राऊत यांनी नमूद केलं.

हेही वाचा : रामदास आठवले आंबेडकरी कलावंतांना करणार प्रत्येकी 5 हजाराची मदत...

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले महाराष्ट्र दिन ( ता. 1) आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आपल्या एक महिन्याच्या वेतनातून राज्यातील आंबेडकरी कलावंतांना आर्थिक मदत करणार आहेत. कोरोनाचा कहर वाढत असताना लॉकडाउनच्या काळात आंबेडकरी गायक कलावंतांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. राज्यात अजून 15 मे पर्यंत लॉकडाउन वाढणार आहे.  या काळात आंबेडकरी गायक शाहीर लोककलावंतांना आर्थिक विवंचना आणि उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून आंबेडकरी कलावंतांना कोणतेही कार्यक्रम मिळालेले नाहीत. गत वर्षी कोरोना रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाउनमुळे आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंतीचे जाहीर  कार्यक्रम करण्यात आले नाही. यंदाही नेमका 14 एप्रिल आंबेडकर जयंतीपासून राज्यात लॉकडाउन लागला असल्याने आंबेडकरी कलावंतांना  कार्यक्रम मिळालेले नाहीत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख