अनिल देशमुखांसाठी बुधवार महत्वाचा : सर्व दुवे जुळविण्यासाठी सीबीआयने उचलले हे पाऊल

या प्रकरणावर देशमुख यांचे राजकीय भवितव्य ठरणार....
anil deshmukh ff
anil deshmukh ff

मुंबई : माजी गृहमंत्री यांना अपेक्षेप्रमाणे सीबीआयचे चौकशीसाठी समन्स आले आहे. येत्या बुधवारी (ता. 14) त्यांना सीबीआयसमोर आपली बाजू मांडायची आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होणार आहे.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआयला पंधरा दिवसांत चौकशी पूर्ण करून नंतर पुढील कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यानुसार या प्रकरणातील संबंधितांचा जबाब सीबीआय नोंदवून घेत आहे. खुद्द परमबीरसिंग यांची चौकशी सीबीआयने केली आहे. याशिवाय ज्यांच्याकडे देशमुख यांनी शंभर कोटींची मागणी केली त्या अधिकाऱ्यांचाही जबाब सीबीआयने नोंदविला आहे. या प्रकरणातील मुख्य चेहरा असलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची चौकशी एनआयए कोठडीतच सीबीआयने पूर्ण केली. याशिवाय सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, देशमुख यांचे स्वीय सहायक संजय पलांडे, कुंदन यांनाही सीबीआयने चौकशीसाठी बोलविले होते. या सर्वात शेवटी आता अऩिल देशमुख यांची चौकशी होणार आहे. या चौकशीच्या विरोधात अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांना दिलासा मिळू शकला नाही. यासंदर्भात वकील जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका करून सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

या प्रकरणातील इतर प्रमुख साक्षीदारांची चौकशी पूर्ण झाल्याने देशमुख यांचा जबाब महत्वाचा ठरणार आहे. देशमुख यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी वाझे, पाटील आणि पोलिस उपायुक्त दिलीप भुजबळ यांना बोलावून त्यांच्याकडे मुंबईतील हाॅटेलचालक, हुक्का पार्लर यांच्याकडून हफ्ते गोळा करून देण्यास सांगितल्याचा आरोप परमबीरसिंग यांनी केला होता. मात्र परमबीरसिंग यांनी आरोप केलेल्या तारखांच्या दिवशी आपण नागपुरात उपचार घेत होतो आणि नंतर होम क्वारंटाईन झालो, असा पवित्रा देशमुख यांनी घेतला. त्यामुळे देशमुख त्यांच्या जबाबात काय सांगणार आणि सीबीआय काय दुवे जुळवणार, याकडे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com