मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा  - CBI raids former Home Minister Anil Deshmukh's house | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री  अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला आहे. देशमुख यांचे मुंबई , नागपूर येथील दहा ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहे. शंभर कोटी गैरव्यवगारप्रकरणी अनिल देशमुख यांनी नुकतीच चैाकशी झाली होती. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने देशमुखांवर आरोप केला होता. दर महिन्याला शंभर कोटीची वसूलीचे आदेश देशमुखांनी आपल्याला दिला होता, असा आरोप वाझे याने केला होता.  

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते.

अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना (Sachin Waze) निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते.

हेही वाचा  :  कोरोना काळात न दिसल्याच्या कारणाने आमदाराला जिवंतपणी श्रद्धांजली : गुन्हा दाखल
 
नागपूर : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरू असताना कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे ते हरवले असल्याच्या पोस्ट समाज माध्यमांवर फिरत होत्या. त्यातच एकाने त्यांना श्रद्धांजलीसुद्दा अर्पण केली. त्यामुळे चिडलेल्या आमदाराने थेट वाठोडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. ग्रामीण भागातही झपाट्‍याने करोनाचे संक्रमण वाढले आहे. मात्र लोकप्रतिनिधी दिसत नसल्याच्या तक्रारी आहे. बेड्‍स, ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हिर मिळत नसल्याने जनता हतबल झाली आहे. अशा परिस्थितीत कामठीचे आमदार काहीच मदत करीत नाही. ते दिसत नाहीत आणि तक्रारीची दखलही घेतल नसल्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे एका संतप्त नागरिकाने आमदार टेकचंद सावरकर हरवले असल्याची पोस्ट टाकली. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना चांगलीच संधी मिळाली. ही पोस्ट संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाल्याने चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. यात एकाने व्हाट्‍ॲपवर चक्क आमदाराला श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे आमदार चांगलेच संतापले. प्रीतम व त्याच्या दोन साथीदाराच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत विचारणा केली असताना सावरकर यांनी पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजप विरोधकांचा हा डाव असल्याचे सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख