दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा : आठवले 

दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याची दाट शक्‍यता आहे.
CBI probe into Disha Salian's death : Ramdas Athavale
CBI probe into Disha Salian's death : Ramdas Athavale

मुंबई : दिशा सालियन हिच्या मृत्यूची मुंबई पोलिसांनी अपमृत्यू म्हणून नोंद केली आहे. दिशा हिने आत्महत्या केल्याचे मुंबई पोलिस सांगत असले तरी दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे दिशा सालियन हिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आपली मागणी आहे. त्याबाबतचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपण पाठवित असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची दिशा सालियन ही माजी व्यवस्थापक होती. तिने मालाडमध्ये तिच्या निवास स्थानी पार्टी दिली होती. मग त्याच रात्री ती आत्महत्या का करील? पार्टी झाली त्या रात्री दिशावर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा संशय आहे. दिशाचा मृतदेह पोलिसांना मिळाल्यानंतर त्या मृतदेहाचा पोस्ट मार्टम रिपोर्ट काय सांगतो, असा सवाल आठवले यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई पोलिस खून झाल्यानंतर लगेच आरोपीपर्यंत पोहचतात. मात्र, दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांवर राज्य सरकारचा दबाव असल्याची शंका येते. एका महिलेची हत्या ही आत्महत्या दाखवून प्रकरण दडपले जाणार असल्याची दिशा मृत्यू प्रकरणी शंका येते, असे आठवले यांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, "मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की दिशा मृत्यू प्रकरणी कोणीही तक्रारदार नाही, त्यामुळे दिशा मृत्यूप्रकरणी हत्या असावी, याबाबत मुंबई पोलिसांचा तपास पुढे गेला नाही. खरे म्हणजे मृतदेह सापडल्यानंतर मुंबई पोलिस सुगावा काढत गुन्हेगारापर्यंत पोचतात. या प्रकरणात मात्र मुंबई पोलिस तक्रारदराची का वाट पाहत आहेत? कोणी तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही.' 


दिशा सालियनच्या मृत्यूची मुंबई पोलिसांनी तिची हत्या झाली असावी का? या शक्‍यतेच्या दृष्टीने स्वतःहून तपास करणे आवश्‍यक होते. दिशा सालियनचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर सुशांतसिंह राजपूतही अस्वस्थ झाला होता.

दिशा सालियनच्या मृत्यूची सुशांतसिंहच्या आत्महत्येशी काहीतरी संबंध असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आपली मागणी आहे. या मागणीचे पत्र आपण लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com