मोठी बातमी : परमबिरसिंह यांनी व्यापाऱ्याकडे मागितली खंडणी; गुन्हा दाखल  - A case has been registered against former Mumbai Police Commissioner Parambir Singh-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

मोठी बातमी : परमबिरसिंह यांनी व्यापाऱ्याकडे मागितली खंडणी; गुन्हा दाखल 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी अटक ही केली आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंह  (Parambir Singh) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परमबिरसिंह यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी परमबिरसिंह यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (A case has been registered against former Mumbai Police Commissioner Parambir Singh) 

या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी अटक ही केली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आरोपी व इतर सहकारी साथीदार व संबंधित पोलिस अधिकारी यांचे विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 299/ 21, कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465,467, 468, 471,120(b),166,167,177,181,182,193,195,203,211,209,210,347,109,110,111,113 भा .द .वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्यातील 2 आरोपी अटक करण्यात आले आहे.

देखमुखांनी भाजपसाठी जे केले: ते भरणे राष्ट्रवादीसाठी करुन दाखवतील काय?

श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी या प्रकरणी माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंह, डीएसपी अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, लाचलुचपत प्रबंधक विभागाने (एसीबी) पोलिस निरिक्षक अनुप डांगे यांच्या तक्रारप्रकरणी परमबीरसिंह यांच्याविरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी गृह विभागाकडे मागितली होती. त्यानुसार गृहविभागाने परमबीरसिंह यांच्याविरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. डांगे यांच्या तक्रारीनुसार 23 नोव्हेंबर 2019 ला गावदेवी येथील डर्टीबन्स पब रात्री उशीरापर्यंत सूरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलिस तेथे गेले होते. त्यावेळी तेथे दोन गटांमध्ये सुरू असलेल्या मारहाणीप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी व निर्माता भरत शहाचा नातू यश, याचे दोन मित्र व तीन विरोधक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हेही वाचा : यशस्वी मुख्यमंत्री अन् सक्षम विरोधी पक्षनेता...

त्यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेले पोलिस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. त्यात पवार यांचा गणवेशही फाटला होता. त्यानंतर इतर पोलिसांनी मध्यस्थी करून पवार यांची सुटका केली व यश व त्याच्या काही मित्रांना घेऊन पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणात जीतू नवलानीचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आले होते. या घटनेनंतर तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक असलेल्या परमबीरसिंग यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते, असा आरोप डांगे यांच्या लेखी तक्रारीत केला होता. 

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख