काँग्रेस आमदार भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल  

कोविड-१९ मुळे राज्यात जमाव बंदी असल्याने पोलिसांनी काँग्रेस भाई जगताप यांना आंदोलन थांबावयला सांगितले होते.
 Bhai Jagtap .jpg
Bhai Jagtap .jpg

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसच्या (Congress) वतीने पेट्रोल दरवाढी विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. शनिवारी गोरेगाव येथे पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढी विरोधात  काँग्रेस आमदार तथा मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (MLA Bhai Jagtap) आणि काँग्रेस कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. (Case filed against Congress MLA Bhai Jagtap)

दरम्यान, कोविड-१९ मुळे राज्यात जमाव बंदी असल्याने पोलिसांनी काँग्रेस भाई जगताप यांना आंदोलन थांबावयला सांगितले होते. मात्र, आंदोलन न थांबवता काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर गेले. एवढच नाही तर भाई जगताप यांनी वरीष्ठ पोलिस अधिका-याला बोट दाखवत त्यांच्या बाजूला असलेल्या एका वर्दीतील हवालदाराला थेट जगताप यांनी ढकलले. हे पाहून काँग्रेस कार्यकर्ते अजून जोरात आरडा-ओरडा करु लागले आणि पोलिसांच्या अंगावर जाऊ लागले. हे पाहून शेवटी भाई जगताप यांनीच काँग्रेस कार्यकर्त्यांना मागे लोटले. 

आंदोलनातील अनेकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केले नव्हेत. भाई जगताप यांनी देखील मास्क घातला नव्हता. या प्रकरणी भाई जगताप व गोरव राणे यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यावर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 
देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आता पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. मोदी (Narendra Modi) सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप (BJP) सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com