मनी लाँड्रिंग प्रकरणात बिल्डर अविनाश भोसले यांना ईडीकडून समन्स  - Builder Avinash Bhosale summoned by ED in money laundering case | Politics Marathi News - Sarkarnama

मनी लाँड्रिंग प्रकरणात बिल्डर अविनाश भोसले यांना ईडीकडून समन्स 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

पुणे : पुण्यातील जमीन खरेदीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांना नवीन समन्स बजावले आहे.आज ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलाला ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहायला सांगितलं होतं. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.Builder Avinash Bhosale summoned by ED in money laundering case

भोसले यांनी कोविडचे कारण सांगत ईडीला त्यांची अनुपलब्धता कळविली आहे. अविनाश भोसले यांनी पुण्यात निवासी इमारतीच्या जागी अवैध इमारत बांधली असल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला आहे. भोसले यांनी संबंधित जमीन खरेदीसाठी बेकायदा व्यवहार केल्याचा ही आरोप करण्यात आला आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणात पुण्यातील भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आणि मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता. गेल्याच महिन्यात ईडीने भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची परदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999. (फेमा) अंतर्गत स्वतंत्र चौकशीत सुमारे 40 कोटींची संपत्ती जप्त केली होती.  भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी फेमाच्या उल्लंघन करत दुबईत मालमत्ता संपादन केल्याचे ईडीला आढळलं होतं.

ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांच्यावर कारवाई करत 1 कोटी 83 लाखांचा दंड केला होता. 2007 मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्युटी न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी झाली होती. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरु केली आहे.  रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे.

वादग्रस्त विधान केल्यानं संभाजी भिडे पुन्हा चर्चेत

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केल्यानं ते चर्चेत आले आहेत. यापूर्वी त्यांनी अशी विधानं केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. आषाढी पायी वारीला झाल्यास कोरोनाचे जगभरातून नायनाट होऊन, असे विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख