ज्यांनी कोरोनात अर्थव्यवस्था सांभाळली...त्यांनाच अजितदादांचा दणका!

कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मद्यावर 5 टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढवण्यात आला आहे.
 Ajit Pawar .jpg
Ajit Pawar .jpg

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मद्यावर 5 टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढवण्यात आला आहे. स्वदेशी ब्रॅण्डेड आणि नॉन-ब्रॅण्डेड मद्यावरील व्हॅट 60 वरून 65 टक्के करण्यात आला आहे. मद्यावरील सर्व प्रकारच्या व्हॅटचा दर 30 वरून 40 टक्के करण्यात आला असल्याने राज्यात आता मद्य महागणार आहे. 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला. राज्याचे कर संकलनाचे उद्दिष्ट आणि आर्थिक गणित बसवण्यासाठी अजित पवार यांनी मद्यावर करवाढीची प्रस्ताव ठेवला आहे. कोरोना काळामध्ये सर्वच क्षेत्रे ठप्प झाली होती. लॅाकडाऊनचे निर्बंध कमी झाल्यानंतर राज्य सरकारने दारुची दुकाने सुरु केली होती. त्याद्वारे महसूल मिळून सरकारला काहीसा दिलासा मिळला होता. ज्यांनी कोरोनात अर्थव्यवस्था सांभाळली त्यांनाच अजित पवारांनी करवाढ करून दणका दिला, अशी चर्चा सोशल मीडियात अर्थसंकल्पानंतर रंगली.  

देशी मद्याचे ब्रॅण्डेड आणि नॉन-ब्रॅण्डेड असे दोन प्रकार निश्‍चित केले आहेत. त्यानुसार देशी ब्रॅण्डेड उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या 220 टक्के अथवा 187 रुपये प्रतिलिटर यापैकी अधिक असेल तो लागू होईल. त्यातून राज्याला अंदाजे 800 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. 

मद्यावरील मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूचीनुसार सध्याचा मूल्यवर्धित दर 60 टक्‍क्‍यांवरून 65 टक्के करण्यात आला आहे. तसेच, मूल्यवर्धित कर कायद्यातील काही तरतूदीनुसार मद्यावर सध्या असलेल्या मूल्यवर्धित कराचा दर 35 वरून 40 टक्के वाढवण्याचे प्रस्तावही मांडण्यात आला आहे. यामुळे राज्याला 1 हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com