भैय्या, आपने गलती किया ! मोदी- नितीश को वोट दिया ! राहुल गांधींचा हल्लाबोल  - Brother, you made a mistake! Voted Modi-Nitish! Rahul gandhincha hallabol | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

भैय्या, आपने गलती किया ! मोदी- नितीश को वोट दिया ! राहुल गांधींचा हल्लाबोल 

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

राहुल गांधी हे देशातील शेतकऱ्यांचे कट्टर समर्थक आहे.

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे विरोधक आणि कॉंग्रेसचे फायरब्रॅंड नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये झालेल्या सभांमधून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमारांवरही टीका केली. 

राहुल गांधी हे देशातील शेतकऱ्यांचे कट्टर समर्थक आहे. या देशातील शेतकरी ताट मानेने उभा राहिला पाहिजे आणि सरकारने त्यांना मदत केली पाहिजे अशी भूमिका ते नेहमीच आपल्या भाषणातून मांडत असतात. मोदी सरकारने आणलेल्या कृषि विधेयकालाही त्यांनी विरोध केला आहे.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राने कायदे बदलावेत असे आवाहन केले आहे. 

पंजाबमध्ये अलिकडेच झालेल्या ट्रॅक्‍टर रॅलीत राहुल सहभागी झाले होते. त्यांनी त्यावेळी म्हटले होते, की केंद्रात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास कृषि विधेयके कचऱ्याच्या टोपलीत टाकली जातील म्हणून. आज तर बिहारमध्येही त्यांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरताना नितीशकुमारांवरही जोरदार हल्लाबोल केला. 

येथील जाहीरसभांमधून बोलताना राहुल गांधी म्हणाले, की नितीशकुमार यांच्या पेक्षा ज्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे. तेथील सरकारने शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र नितीशकुमार यांनी बिहारमधील शेतकऱ्यांना न्याय दिला नाही उलट त्यांच्यावर अन्यायच केला. 

जर का छत्तीसगड सरकार धानाला 2500 रुपये शेतकऱ्यांना देत असेल तर बिहारमधील शेतकऱ्यांना ते का दिले जात नाही. बिहारमधील शेतकऱ्यांना धानासाठी केवळ सातशे रुपये मिळतात हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय आहे.आपण चूक केली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांना मतदान केले.

या चुकीमुळेच तुम्हाला किंमत मोजावी लागत आहे. भैय्या, आपने उन्हे सीएम बनाया हे बहुत बडी गलती हो गई ? अब गलती सुधारणेका मौका है! इसबार राजद और कॉंग्रेस गठबंधनको मतदान किजीये असे आवाहनही राहुल गांधी यांनी बिहारी जनतेला केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख