BJP's demand for minimum electricity bill | Sarkarnama

वापरानुसार अथवा किमान विजबिल आकारा : भाजपची मागणी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 जून 2020

लॉकडाउन काळात मुंबई शहरातील दुकाने-कार्यालये बंद असल्याने बेस्ट उपक्रमाने त्यांना अंदाजे बिले न पाठवता प्रत्यक्ष वापराएवढीच बिले पाठवावीत, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. 

मुंबई : लॉकडाउन काळात मुंबई शहरातील दुकाने-कार्यालये बंद असल्याने बेस्ट उपक्रमाने त्यांना अंदाजे बिले न पाठवता प्रत्यक्ष वापराएवढीच बिले पाठवावीत, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. 

कोरोनाच्या फैलावामुळे व नंतर लॉकडाउनमुळे मार्च ते जूनपर्यंत मुंबई शहरातील अत्यावश्‍यक सेवांची दुकाने वगळता जवळपास सर्वच दुकाने बंद होती. अजूनही मॉल, शॉपिंग सेंटर, सलून-ब्यूटी पार्लर, हॉटेल इत्यादी जवळपास बंदच आहेत. मात्र त्यांना "बेस्ट'तर्फे तसेच खासगी वीज कंपन्यांतर्फे सरासरी वापराइतकी किंवा गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यातील वापराएवढी वीजबिले पाठविण्यात आली आहेत. ही बाब चुकीची आहे. 

सध्या दुकाने-कार्यालये बंद असल्याने त्यांचा वीजवापर जवळपास शून्य इतकाच आहे. त्यामुळे त्यांना किमान वापराची किंवा प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार वापराची बिले द्यावीत. एकतर सध्या सर्वांचाच व्यवसाय बंद असल्याने दुकानदारांचे उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत. तरीही दुकानाचे भाडे, नोकरदारांचा पगार व अन्य खर्च त्यांच्या अंगावर पडल्याने ते तोट्यात आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांवर जास्त भार न टाकता त्यांना सवलत द्यावी, अशी मागणी लोढा यांनी "बेस्ट'चे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्याकडे केली आहे. 

खरे पाहता सध्याच्या कठीण दिवसांत राज्य वीज मंडळासह टाटा पॉवर, अदानी आदी खासगी कंपन्यांनीदेखील घरगुती आणि व्यावसायिक वीजबिले ही किमान रकमेनुसार आकारावीत, अशीही मागणी लोढा यांनी केली आहे. 
 

झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वंचितचे राज्यभर आंदोलन ! 

अकोला : राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असून, तपास यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत. कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही, कोणाला पकडले जात नाही, या सर्व प्रकरणांकडे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न होत असून, या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात येत आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सर्व जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील, विभागीय अधिकारी यांना निवेदने देऊन या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 

राज्यात मागासवर्गीयांवर हल्ले असून नागपूर येथे अरविंद बनसोड तर पुणे येथे विराज जगताप या तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच बरोबर औरंगाबाद, जळगाव, रत्नागिरी, परभणी, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मागासवर्गीयांवर हल्ले करण्यात आले. 

यातील काही प्रकरणात दिखाऊपणाची कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी तर आरोपी पकडलेच गेले नाही. ज्यांना पकडले त्यांना सौम्या कलम लावल्याने ते जामिनावर बाहेर आले तर काही ठिकाणी पीडितांवरतीच गुन्हे दाखल करण्यात आले. 

त्यामुळे पोलिसांचे एक प्रकारे समर्थन मिळत असल्याने अशा गावगुंडांचे मनोबल वाढत आहे आणि त्यामुळेच अशा हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. कुंभार, पारधी, नाभिक, बौद्ध, मातंग या व इतर समाजाला लक्ष करून मारहाण केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून आज राज्यभर निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख