भाजप युवा मोर्चा उद्धव ठाकरेंना ७५ हजार पत्र लिहिणार 

मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा कुठला महोत्सव आहे, हे माहीत नाही की ते जाणूनबुजून हे करत आहेत.
BJP Yuva Morcha will write 75,000 letters to Uddhav Thackeray
BJP Yuva Morcha will write 75,000 letters to Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यदिनाचे अज्ञानपण जाहीर झाले म्हणून शिवसेनेचा हा थयथयाट आहे. मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा कुठला महोत्सव आहे, हे माहीत नाही की ते जाणूनबुजून हे करत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री राज्यातील जनतेची क्षमा मागणार आहेत का? असा प्रश्न करून भाजप युवा मोर्चा उद्धव ठाकरे यांना 75 हजार पत्र लिहिणार आहे, त्यात हे स्वातंत्र्यदिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे, हे सांगणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर फुलांचे काटे पाठवून त्यांना आठवण करून देऊ, असा इशारा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. (BJP Yuva Morcha will write 75,000 letters to Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राणेंच्या अटकेबाबत शेलार हे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. 

ते म्हणाले की, राणे यांच्या अटकेच्या प्रकरणात त्या आयपीएस अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव होता. परिवहन मंत्री अनिल परब हे गृहमंत्री नाहीत. मात्र, गृह खात्यात अनिल परब कसा हस्तक्षेप करतात, हे कालची घटना म्हणजे पुरावा आहे. 

नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना झालेली अटक ही संशयास्पद आहे. या प्रकरणी मंत्र्यांसहित अधिकाऱ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर राग का आहे? हाच मुळात प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांच्या विरोधात बोलताना संयम ठेवला पाहिजे, असे सांगितले होते, असेही आशिष शेलार यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची शिवसेनेला भीती का वाटते. राणे मंत्री झाले म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे शिवसेनेने राणे यांच्या अटकेचे हे षडयंत्र रचले होते. राज्यातील सरकार हे दबावतंत्राचा वापर करत आहे. सर्वसमावेशक कारवाई केली जात नाही असा आरोप करून पोलिसांना बाजूला ठेवा आणि मग आंदोलन करायला या, मग बघू असा इशाराही शेलार यांनी या वेळी बोलताना दिला.

ते म्हणाले की, सुभाष जाधव या शेतकऱ्याने, तर पालघरमध्ये आदिवासी कुटुंबातील काळू पवार यांनी 500 रुपयांसाठी आत्महत्या केली. इंदापूर येथे शिवाजी चितळकर या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळून या आत्महत्या होत आहेत. सरकारविरोधात जनक्षोभ वाढत आहे. त्यावरील लक्ष भटकविण्यासाठी शिवसेना आंदोलन करत आहे. शिवसेनेकडून अत्यंत गलिच्छ राजकारण केले जात आहे. सुरुवात तुम्ही केलीय, शेवट मात्र आम्ही करू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com