भाजपचे प्रवक्ते उपाध्ये म्हणाले, ''ठाकरे सरकार, 15 लाख लशींचा हिशोब द्या''  - BJP state spokesperson Keshav Upadhyay accuses Thackeray government | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे प्रवक्ते उपाध्ये म्हणाले, ''ठाकरे सरकार, 15 लाख लशींचा हिशोब द्या'' 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

तीन लाख लशी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

पंढरपूर : ''केंद्र सरकारने राज्य सरकारला सुरवातीच्या काळात लशींचा पुरेशा प्रमाणात पुरवठा केला होता. परंतु राज्य सरकारने नियमानुसार लसीकरण न करता खास  लोकांनाच लस दिली गेली आहे. त्यातच तीन लाख लशी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने 15 लाख लशींचा हिशोब द्यावा. आता पर्यंतच्या पुरवठा केलेल्या लशींची चौकशी करावी,'' अशी मागणी ही भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना केली.

सुरवातीला फंट लाईनवरच्या लोकांचे लसीकरण करणे आवश्यक होते. परंतु सरकारने नियमबाह्यपणे खास लोकांचे लशीकरण केले आहे. शिवाय 3 लाख लोक राखीव ठेवल्याने सध्या राज्यात कृत्रिम लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्रावर आरोप करत आहे. या निमित्ताने ठाकरे सरकारचा हा ढोंगीपणा समोर असल्याचेही केशव उपाध्ये यांनी सांगितले.

हेही वाचा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गैरव्यवस्थापन; केंद्रीय पथकाने ओढले ताशेरे
 
पिंपरी : कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पिंपरी चिंचवडमधील बेड मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय पथकाचे प्रमुख व दिल्ली येथील सफदरजंग मेडिकल कॉलेजचे संचालक प्रा. डॉ. जुगल किशोर यांनी व्यक्त केले आहे. यातून शहरातील बेड व्यवस्थापन समाधानकारक नसल्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच, त्यात सुधारणा होण्याची गरजसुद्धा दिसून आली. पाच दिवसांपूर्वीच शहराचे कारभारी आणि पालिकेतील सत्ताधारी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासन हे कोरोना केअर सेंटर व्यवस्थापनात कमी पडत असल्याचा ठपका ठेवला होता. तसेच, त्यांनी कोरोनाचा उद्रेक झाल्याने युद्धपातळीवर खाटा वाढवा, असेही सुचवले होते. त्यासाठी खासगी रुग्णालयांचे आयसीयू ताब्यात घेण्याचा आदेश त्यांनी पालिका आयुक्तांना दिला होता. या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीही आयुक्तांकडे अशीच मागणी केली होती. त्यावर केंद्रीय पथकाने काल (ता.९) शिक्कामोर्तब केलं. 
 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख