दिलीप वळसे-पाटील यांना बळीचा बकरा केले आहे!

राष्ट्रवादी काँग्रेचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस प्रशासनातील 'संघ' निष्ठ अधिकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे.
 Dilip Walse-Patil.jpg
Dilip Walse-Patil.jpg

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस प्रशासनातील 'संघ' निष्ठ अधिकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारपरिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे का? गुन्हेगारी संघटना आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता पर्यंत देशातील सगळ्या अडचणींमध्ये देशासाठी लढला, झिजला हे सांगायला तुम्ही लागत नाही. हे सर्वसामान्यांना माहीत आहे त्यामुळे, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी संघाला मधे आणू नका.'' असे पाटील म्हणाले.

''दिलीप वळेस पाटील यांनी असे म्हटले आहे की कोण कोण अधिकारी संघाशी संबधित आहेत, हे आम्ही शोधून काढू. गांधींच्या हत्येच्याबाबत देखील न्यायालयाने निकाल दिला की संघाचा गांधींच्या हत्येत हात नाही. त्यावेळी तर तुमचीच सरकारे होती. देशामध्ये कोरोना हे तर आताचे उदाहरण आहे, त्याशिवाय सगळ्या अडचणींमध्ये समाजासाठी कोण धावून आले? लातूरचा भूकंप, कुठे पूर परिस्थिती की आताचा कोरोना असू दे, युद्ध झाले.. सगळ्या विषयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशासाठी समाजासाठी झिजला'' असे पाटील यांनी सांगितले. 

तुम्ही एक जबाबदार नेते आहात, माझे तुमच्यावर प्रेम आहे. पण तुम्ही तुमच्या राजकीय आवश्यकतेपोटी संघाला यात आणू नका. तुम्ही हे म्हणा की कोण अधिकारी विरोधी पक्षाला माहिती पुरवतात, आता तुमची प्रशासनावर पकड नाही त्याला आम्ही काय करणार? पण त्याला संघाचे लेबल लावू नका आणि संघाचे शोधून तुम्ही काढताय, कायदा संपला आहे का? संघ ही टोकाची राष्ट्रावर श्रद्धा असणारी समजावार प्रेम असणारी संघटना आहे. त्यामुळे तुमच्या वादामध्ये राजकीय हितासाठी संघाला मधे ओढू नका, असे पाटील म्हणले.

तसेच, दिलीप वळसे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र, माझे म्हणणे आहे की त्यांना बळीचा बकरा केला आहे. त्यांची अॅन्जीओप्लास्टी झालेली आहे. त्यामुळे ज्या प्रकारे गृहखात्यामध्ये त्यांना आगामी काळात भूमिका बजवावी लागणार आहे, हे ते कसे सहन करू शकतील हा प्रश्न आहे. मात्र हा त्यांच्या पक्षाचा व त्यांचा वैयक्तिक विषय आहे, मैत्री वेगळी व पक्ष वेगळा.'' असे देखील यावेळी पाटील यांनी यावेळी बोलून दाखवले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com