ठाकरेंना बारमालकांची काळजी..सामान्य माणसा, "तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे.." उपाध्यांचा सल्ला

मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे.
Sarkarnama Banner (1).png
Sarkarnama Banner (1).png

मुंबई :  राज्यातील लॅाकडाउन ३१ मे पर्यंत वाढविला आहे.  लॅाकडाउनमुळे सर्वसामान्यांचे खूप हाल होत आहे. यावरुन  भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP Spoksperson Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. टि्वट करत त्यांनी 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बारमालकांनी काळजी, तु तुझ्या कुटुंबाची काळजी घे,' असे सर्वसामान्यांना सांगितलं आहे. BJP spokesperson Keshav Upadhyay criticizes Uddhav Thackeray on lockdown

आपल्या टि्वटमध्ये केशव उपाध्ये म्हणतात की मुख्यमंत्री  म्हणालेच होते, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी!"...सामान्य माणसा, नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा EMI, तुझा घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा.

"मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाही, वसुली सरकार मध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला  @FarOutAkhtar लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली," असे टि्वट केशव उपाध्ये यांनी केलं आहे. 

देशात गेल्या चोविस तासांत, देशात 3 लाख 48,421 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, देशातील सक्रीय कोविड रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घसरण सुरू असून, सक्रीय रुग्णसंख्येत 11 हजार 122 नी घसरण झाली आहे. देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांची संख्या 37 लाख 4 हजार 99 झाली आहे, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवर सर्वात जास्त म्हणजे 40 हजार 956 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. त्यापाठोपाठ, कर्नाटकात एका दिवसात 39 हजार 510 आणि केरळमध्ये 37 हजार 290 नवे रुग्ण सापडले. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात साडे सतरा कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आतापर्यंत 18 ते 44 वर्षे वयोगटातील 30 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. भारतात आतापर्यंत कोविड मुक्त झालेल्यांची संख्या 1 कोटी 93 लाख 82 हजार 642 आहे, तर राष्ट्रीय रोगमुक्ती दर 83.04 टक्के आहे.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com