मुंबई महापालिकेत मनसे-भाजप एकत्र येणार ?  

भाजपला घटक पक्षांसह मनसेला सोबत घ्यावे लागेल, असे मुंबई भाजपत बोलले जाते.
Sarkarnama Banner - 2021-06-30T113134.715.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-30T113134.715.jpg

मुंबई : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत (Corporation election 2021) प्रभागांची रचना करताना भौगोलिक समानता राखण्यात येणार आहे. निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. महानगरपालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी प्रभागरचना करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.BJP role regarding MNS is unclear for Mumbai Municipal Corporation

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक घटक पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मनसेबाबत अद्याप भाजपची भूमिका तळ्यातमळ्यात आहे. मुंबई महानगरपालिच्या २२७ जागांसाठी भाजपने कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी घेत ८२ जागा पटकावल्या होत्या. या कामगिरीची उजळणी करावयाची झाल्यास भाजपला घटक पक्षांसह मनसेला सोबत घ्यावे लागेल, असे मुंबई भाजपत बोलले जाते. 

भाजपने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपाई, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत शेतकरी संघटना यांना मित्रपक्ष मानले आहे. रिपाई वगळता इतर घटक पक्षांची राजकीय ताकद मुंबई शहरात तोळामासा आहे. रिपाईचा भाजपला फायदा होत आल्याचे राजकीय विश्लेषणाने समोर आल्याचे बोलले जाते.  मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचीही काही ठिकाणी ताकद आहे. असे जरी असले तरी मनसे बाबत भाजपला राजकीय रणनिती ठरवावी लागणारच आसल्याचे भाजपात बोलले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सोबत आला तर शिवसेनेला चांगली टक्कर देता येईल,असे मुंबई भाजपातील काही जणांचे मत आहे.

प्रभाग रचनेबाबत भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे ; तर प्रभागरचना करताना त्यावर काही आक्षेप नोंदविण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचे पत्र पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिले होते. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने त्यांना लेखी उत्तर दिले. ‘प्रभागरचनेचा मसुदा तयार झाल्यानंतर त्यावर सूचना व हरकती मागविण्यात येतील,’ असे या उत्तरात नमूद केले आहे.प्रभागरचना २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. यात भौगोलिक समानता राखण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काही भागांत पुनर्विकास झाला आहे; तर काही भागांतील मतदार स्थलांतरित झाले आहेत. त्यांचा विचार करून प्रभागांची रचना करण्यात येईल, असेही सांगितले.

 Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com