भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत रवी हे उद्या बैठक घेणार आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर 

मुंबई : राज्यात भाजपच्या जोरदार संघटनात्मक हालचाली सुरु असून महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सी. टी. रवी आज आणि उद्या असे दोन दिवसांच्या मुंबई दौ-यावर आहेत. 

प्रभारी झाल्यावर पहिल्यांदाच रवी मुंबई दौ-यावर आले आहे. मुंबईत दाखल होताच त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी भेट घेतली. मुंबईतील प्रदेश कार्यालय आणि मुंबई पक्ष कार्यालयातील पदाधिकाऱ्यांशी ते चर्चाही करणार आहेत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत रवी हे उद्या बैठक घेणार आहेत. तसेच 18 ते 20 डिसेंबरदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाही महाराष्ट्र दौ-यावर येणार असल्याची माहिती पक्षाच्यावतीने आज देण्यात आली. 

पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडूत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष नड्डा हे दौऱ्यावर असतात. दिल्लीतही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा तोडगा निघावा यासाठी नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांच्या बैठका होत असतात. नड्डा महाराष्ट्रात येऊन कोणती घोषणा करतात याकडेही पक्षाचे लक्ष लागले आहे. 

राज्यातील भाजप नेते ठाकरे सरकारवर नेहमीच सडकून टीका करीत असतात. शिवसेना हा भाजपचा एकेकाळच्या मित्रपक्ष होता. मात्र 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी फारकत घेऊन दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी केली. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आले. 

रवी यांनी पक्ष संघटनेचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. त्यादृष्टीने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. 

हे ही वाचा : 
कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे मी पक्ष सोडला : उर्मिला मातोंडकर 

मुंबई : कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे मी कॉंग्रेस सोडली. पण कॉंग्रेसच्या नेत्यांबाबत माझ्या मनात आदर आहे. मी एक आर्टिस्ट आहे राजकारणी नाही अशी कबुली देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मला फोन केला होता. मी शिवसेनेत आली आहे. हा पक्ष सर्व संकटांना तोंड देत पुढे आला आहे अशी माहिती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज दिली. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी आज पुन्हा शिवसेना आणि देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मातोंडकर म्हणाल्या, की शिवसेनेने जनतेला दिलासा आणि धैर्य दिला आहे.हा पक्ष सर्व संकटांना तोंड देत पुढे आला आहे. तसेच हिंदू धर्म म्हणजे महान धर्म आहे.हिंदू धर्मामागील विचार हा खूप मोठा आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाला मला पुढे घेऊन जायचं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com