भाजप खासदाराच्या ताफ्यातील गाडी पेटली...

भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली.
 fire .jpg
fire .jpg

मुंबई : भाजप खासदार कपिल पाटील आज कार्यक्रमानिमित्त कल्याण येथे आले होते. त्यांच्या ताफ्यातील गाड्या खाली पार्क करून ते पाटीदार भवन हॉल येथील कार्यक्रमासाठी गेले. यादरम्यान, पाटील यांच्या ताफ्यातील अंगरक्षकाच्या स्कॉर्पियो गाडी रस्त्यावर उभी असताना गाडीने अचानक पेट घेतला. 

भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले. 

हे ही वाचा...

ॲम्बुलन्स आणि परवानगी असलेली सरकारी वाहने पंचर होणार नाही का ? 

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बुलडाणा जिल्हा प्रशासनाने शहरात लॉकडाऊन केले. यामध्ये दूध व्यावसायिक प्रभावित झाले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी प्रशासनाशी चर्चा करून त्यांना दिलासा दिला. त्यानंतर टायर पंचर दुकानदारांचाही व्यवसाय जिल्हा प्रशासनाच्या निर्णयामुळे ठप्प झाला होता. तेव्हा लॉकडाऊनच्या काळात ॲम्बुलन्स आणि परवानगी असलेली सरकारी वाहने पंचर होणार नाही का, असा सवाल करीत तुपकरांनी पंचरवाल्यांनाही न्याय मिळवून दिला. 

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेले वर्ष सर्वांसाठीच खराब गेले. त्यानंतर प्रत्येक सावरण्याच्या प्रयत्नांत असतानाच यावर्षी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. अशात जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्‍नाबाबत तुपकरांनी जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून त्यांना दिलासा मिळवून दिला. त्यानंतर पंचरवाल्यांसमोर पोटापाण्याचा प्रश्‍न उभा राहिला. यातून रविकांत तुपकर मार्ग काढू शकतात, असा विश्‍वास त्यांना होता. त्यामुळे त्यांनी तुपकरांची भेट घेतली.  त्यांनीही लगेच त्यांच्या प्रश्‍नाची सोडवणूक केली. लॉकडाऊनच्या काळात पंचर दुकानदारांची कशी गरज आहे, हे त्यांनी जिल्हा प्रशासनाला पटवून दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांचे म्हणणे पटले आणि त्यांनी पंचरची दुकाने सुरू ठेवण्याबाबतचा सुधारित आदेश काढला. 

कोरोनामुळे पंचर दुकानदारांच्या पोटावर लाथ बसत असल्याने तसेच अँब्युलन्स व परवानगी असलेल्या वाहनांचे पंचर काढण्यासाठी पंचर दुकाने नियमित सुरू ठेवण्याची परवानगी देऊन दिलासा द्यावा, याकरिता रविकांत तुपकर काल प्रशासनाशी भांडले. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती व अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांची भेट घेतल्यानंतर समस्या दूर करण्याची मागणी केली. नियम पाळण्याच्या अटीवर परवानगी देत सायंकाळी वेळेचा सुधारित आदेश काढण्यात आला. त्यामुळे प्रमुख प्रश्न मार्गी लागला.
 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com