नारायण राणे दिल्लीला रवाना; मोठ्या घडामोडींची चिन्हे   - BJP MP Narayan Rane leaves for Delhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

 नारायण राणे दिल्लीला रवाना; मोठ्या घडामोडींची चिन्हे  

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जुलै 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भापजचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सोबत त्यांची बैठक होणार आहे. 

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) दिल्लीला रवाना झाले आहेत. ते दुपारी दिल्लीत दाखल होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भापजचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सोबत त्यांची बैठक होणार आहे. (BJP MP Narayan Rane leaves for Delhi)  

केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार होण्याची शक्यता असून चर्चेत असलेल्या सर्वच नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावून घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे नारायण राणे यांना मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. 

नाणारचे समर्थन करत शेकडो शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश

दरम्यान, मी आभार मानतो आणि असे काही घडो आणि तुमच्या तोंडात साखर पडो. जोपर्यंत अधिकृत पत्र येत नाही आणि मी जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा, असे सूचकपणे हसत नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात तुमच्या नावाची चर्चा होतेय या प्रश्नाच्या उत्तरादाखल भाष्य केले होते.  

राज्यातील विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून (ता. ५ जुलैपासून) सुरू झाले. अधिवेशन आणि त्यातील घडामोडींवर राणे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले होते. विधानसभेतील भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत राणे म्हणाले की, सरकारला वाचवण्यासाठी आमदारांचे निलंबन केले. सरकारने जरी आमच्या बारा आमदारांचे निलंबन केले असले तरी आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. भास्कर जाधव कुठे आहेत. कुठल्या पक्षात आहेत, हे शोधावे लागते. देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेते आहेत. उद्या मुख्यमंत्री होतील, भास्कर जाधव कोण आहेत, असा सवालही त्यांनी केला.

भास्कर जाधव यांनी अनिल कुंबळेचे रेकॅार्ड मोडले...एकाच इनिंगमध्ये १२ बळी!

केंद्रीय मंत्रीमंडळासाठी नंदुरबारच्या खासदार डॅा. हिना गावित यांचे नावही आघाडीवर आहेत. याशिवाय बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, सांगलीचे संजयकाका पाटील आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्याही नावांना पसंती आहे. राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत.   

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख