अनिल परब यांच्यानंतर आपला नंबर लागेल म्हणून मुख्यमंत्री घाबरलेत! 

माजी पोलिस अधिकारी प्रदिप शर्मांना आमदारकीचे तिकिट शिवसेनेने दिले, किती पैसे घेतले मला माहिती नाही.
 Uddhav Thackeray, Narayan Rane, .jpg
Uddhav Thackeray, Narayan Rane, .jpg

मुंबई : एनआयएचा (राष्ट्रीय तपास यंत्रणा) अहवाल येईल तेव्हा सगळे बाहेर येईल. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नंतर आपलेही नाव समोर येईल म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घाबरले आहेत. हे घाबरट मुख्यमंत्री आहेत, राज्यातील कोणत्याच विषयावर ते बोलत नाहीत, त्यामुळे ते मुके मुख्यमंत्रीही आहेत, असा टोला भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लागावला आहे.

नारायण राणे मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. राणे म्हणाले, माजी पोलिस अधिकारी प्रदिप शर्मांना आमदारकीचे तिकिट शिवसेनेने दिले, किती पैसे घेतले मला माहिती नाही. शिवसेनेत कोनतेच पद फुकट मिळत नाही, असा निशाणा त्यांनी शिवसेनेवर साधला. निरपराध माणसे मरताहेत, अनेक आत्महत्यांचे गुड ऊकलले नाही. हे राज्य सुरक्षित नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे राज्याचा विकास खुंटला आहे. मुख्यमंत्री स्वत:च्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही, ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? अशा बोचऱ्या शब्दात राणेंनी टीका केली. राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार कमी पडले, असेही ते म्हणाले.

राज्यात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय कमी आहेत. याबद्दल राज्य सरकार केंद्राला टारगेट करत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. पण उपाययोजना करायला महाराष्ट्र कमी पडत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या जी वाढतेय त्याचे गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॅाकडाऊन करण्याविषयी तुम्हाला फोन केला होता का असे विचारल्यानंतर राणे म्हणाले, त्यांची मला फोन करण्याची हिंमत नाही. या राज्याला ड्रायव्हर पाहिजे होता की मुख्यमंत्री असा सवाल त्यांनी केला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लोकांमध्ये कधी गेले होते. त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नसल्याचे राणे म्हणाले. 

ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. याशिवाय त्यांनी बाकी जी कारणे सांगितली आहेत, डॉक्टर नर्सेस नाहीत, मग ही कुणाची जबाबदारी आहे? जसी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', महाराष्ट्र जर तुमचे कुटुंब असेल तर या सगळ्या गोष्टी उपलब्ध करणे, रुग्णांवर योग्यरित्या उपचार करणे, त्यांना ठणठणीत करणे ही तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात का जाऊन बसताय? मातोश्रीच्या बाहेर पडत नाही. मग कोरोना होईल कसा? केंद्राकडे बोट दाखवणे बंद करा, अशा शब्दा राणे यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला.

सचिन वाझेला मुंबईतून 100 कोटी जमा करायला सांगितले. हे आदेश फक्त अनिल देशमुखांचे नाहीत. राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांचे हे आदेश आहेत. मग तुम्ही हे जमा केलेले पैसे लसीसाठी का नाही वापरत? ते पैसे कुठे जातात? कुणाकडे जातात? सांगाना कुणीतरी, असे ही राणे म्हणाले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाद काहीच नाही. भाजपशी वाद घालण्याची ताकत त्यांच्यात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे ५६ आमदार असतांना मुख्यमंत्री झाले. 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उगाच कोणाला पाठीशी घालू नये, आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. ते आम्ही बाहेर काढू, अशा इशारा राणे यांनी दिला. यांना राज्य चालवता येत नाही. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवाड यांनी राज्यात तीन आठवड्यांचा लॅाकडाऊन लावाला लागेल असे म्हटले होते. त्यावर राणे म्हणाले, वडेट्टीवार निवडणून येतात त्या भागात नियमीत लॅाकडाऊन असतो, त्यामुळे त्यांना काय माहिती लॅाकडाऊन केल्याने काय होते ते?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com