लखनऊ: नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्य करणारे भाजपचे आमदार पुन्हा अशा एका वादग्रस्त व्यक्तव्याने चर्चेत आले आहे. दररोज गोमूत्रं प्राशन केल्याने कोरोना होत नाही, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. BJP MLA recommends drinking cow urine to stop Covid spread
कोरोनापासून बचाव करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या बलियाच्या बैरिया विधानसभेचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी "मी रोज गोमूत्र पितो. त्यामुळेच निरोगी आहे. सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता ठंड पाण्यात 5 झाकण गोमूत्र मिसळून प्यावं आणि यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नये, "असा सल्ला देत स्वतः गोमूत्र पितानांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
संभाव्य तिस-या लाटेचा धोका टाळण्यासाठी मुलांसाठी स्वतंत्र्य रुग्णालय
सुरेंद्र सिंह म्हणतात की, कोरोनाच्या काळात विज्ञानही फेल ठरलं आहे. अशात या गोमूत्रानं मला अजूनही सुरक्षित ठेवलं आहे. गोमूत्र पिल्याने कोरोनासह कोणताच आजार तुम्हाला होणार नाही, वैद्यकीय उपचारांपेक्षाही हा पर्याय उत्तम आहे. गोमूत्रं प्यायल्याने मी ठणठणीत आहे. बेरिया विधानसभेतील नागरिकांनी सुद्धा गोमूत्र प्यावं. हा पातंजलिचा गोधन अर्क आहे. मी रोज सकाळी रिकाम्या पोटी पाच बूच गोमूत्रं थंड पाण्यात मिसळून पितो. त्याचे वैज्ञानिक तत्व काय आहेत हे मला माहीत नाही. मात्र, गोमूत्र प्राशन करून मी 18 तास तुमच्यासोबत असतो.
गोमूत्र कसे प्यावे, याची माहितीही सुरेंद्र सिंह यांनी दिली. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात दोन ते तीन बूच गोमूत्र टाका. त्यानंतर ते प्या. गोमूत्र प्यायल्यानंतर अर्धातास काहीच खाऊ नका, असं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय त्यांनी हळद गरम करून त्याची पावडर करून सेवन करा. त्याने बराच फायदा होतो, असा दावाही सुरेंद्र सिंह यांनी केला आहे.
Edited by : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.