"आंदोलन पेटविण्यासाठी टायर आणा" भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल - BJP MLA Ravind Chavan orders workers to bring tires OBC agitation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

"आंदोलन पेटविण्यासाठी टायर आणा" भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 जून 2021

आमदार रविंद्र चव्हाण यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कल्याण :  राज्यभरात उद्या भाजपकडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जाणार आहे. कल्याण डोंबिवलीसह अन्य भागात हे आंदोलन कशा प्रकारे केले जाईल यासाठी भाजपकडून कल्याण पूर्वेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदाराने आंदोलन पेटविण्यासाठी टायर आणा, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. BJP MLA Ravind Chavan orders workers to bring tires OBC agitation

या बैठकीस भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे कार्यकर्त्यांना आंदेलन कसे करायचे हे सांगताना दिसून येत आहेत. सरकारचे या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी उग्र आंदोलन करण्याचे ते सांगत आहे. कार्यकर्त्यांना ते म्हणाले, ''लपून छपून टायर घेऊन या. चक्काजाम करा.. टायर कशासाठी आणला जातो हे सांगण्याची गरज नाही. चक्का जाम करण्यासाठी त्याचा वापर करा" आंदोलनासाठी भाजपने कशी तयारी आहे हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ कालचा असल्याचे समजते. आता पोलिस आणि प्रशासन आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्याचे लक्ष आहे. 

गुलाबराव पाटलांनी माझ्या कामांचे कैातुक करुन प्रोत्साहन द्यावे : खडसे
 
जळगाव : ''केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही, मात्र मंत्री  गुलाबराव पाटील हे मला वडीलांसारखे आहेत, त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज होती,'' असे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे.केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना यांच्यात  श्रेयाची स्पर्धा घेण्यावरून वाद सुरू आहे. याच वादातून राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावर टीका केली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख