मंदिरं उघडण्यासाठी भाजपकडून ठाकरे सरकारला अल्टिमेटम

भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
2ram_kadam_udhhav_thackrey.jpg
2ram_kadam_udhhav_thackrey.jpg

मुंबई : महाविकास आघाडी सरकार Uddhav Thackeray राज्यात अनेक गोष्टी अनलॅाक करीत आहेत. दुकाने, मॉल यांच्यावरील काही निर्बंध कमी करण्यात आले आहेत. पण अद्याप मंदिरं उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने Uddhav Thackeray घेतलेला नाही, यावरुन भाजप नेत्यांनी आक्रमणपणे भूमिका घेतली आहे. घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम ram kadam यांनी यावरुन ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. 

राम कदम म्हणाले, ''महाराष्ट्रात सरकारने आता हळूहळू सर्व गोष्टी उघडल्या आहेत. बाजारपेठा उघडल्या आहेत.  दारुची दुकाने तर अगोदरच उघडली आहेत. मंत्रालयात जेव्हा दारुच्या बाटल्या सापडल्या तेव्हा लोकांना कळलं की ठाकरे सरकारचे दारुवर विशेष प्रेम आहे.  आता तर सरकारने बिअर बार पण उघडले आहेत. काही नियम आखून दिले आहेत.'' 

शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करुन फोन..चाकण पोलिसांकडे तक्रार
''आमचा सरकारला साधा एकच प्रश्न आहे की, जर तुम्ही दारुची दुकानं, बिअर बार उघडता पण मंदिरं का उघडत नाही. सरकारची ही भूमिका न पटणारी आहे. म्हणून जर सरकारने येत्या मंगळवारपर्यंत  नियमासहित मंदिरं उघडली नाही, तर येत्या मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात आम्ही स्वत: दर्शनाला जाऊ. महाराष्ट्र सरकाचं मदिरालयावरच प्रेम देशाने, महाराष्ट्राने पाहिलं पण त्यांचा देवलयाला विरोध का ? याच उत्तर देताना त्यांनी ताबडतोब देवालय सुरु करावीत. काही नियम असतील, तर त्याचं आम्ही स्वागत करु" असं कदम यांनी एका व्हिडिओम्ध्ये म्हटलं आहे.

मनसे नेते गजानन काळेंवर गुन्हा दाखल, पत्नीकडून मारहाण केल्याचा आरोप
नवी मुंबई :  मनसे  MNS शहर अध्यक्ष गजानन काळे Gajanan Kale यांच्यावर त्यांच्याच पत्नीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारीरिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत आणि मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
 Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com