शिवसेनेला वचन पाळणारा मित्र म्हणणे ही राष्ट्रवादीची हतबलता... - BJP MLA Ram Kadam criticizes NCP | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेला वचन पाळणारा मित्र म्हणणे ही राष्ट्रवादीची हतबलता...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र नोदी यांचे कौतूक करत ते देशातील सर्वात मोठे नेते असल्याचे म्हटले होते.

मुंबई : गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) २२ वा वर्धापनदिन पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना हा वचन पाळणारा मित्र, असल्याचे म्हटले होते. त्यावरुन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. (BJP MLA Ram Kadam criticizes NCP)

त्या संदर्भात राम कदम यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. त्यामुळे शरद पवार यांनी गुरुवारी (ता.१० जून) ला सांगितले की शिवसेना हा वचन पाळणार पक्ष आहे. मात्र, असे कधी म्हणावे लागते जेव्हा एखादा मित्र वचन पाळत नसेल तेव्हा, ही काही जाहीर सांगण्याची गोष्ट नाही. ज्या शिवसेनेने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व सोडले तो पक्ष वचन पळणारा पक्ष आहे का, शरद पवार याना शिवसेना हा वचन पाळणारा मित्र आहे असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी पक्षाची राजकिय हतबलता...असल्याची टीका राम कदम यांनी केली. राऊत यांनी मोदींचे केलेले कौतुक खूपच जिव्हारी लागले आहे असेही ते म्हणाले. 

हे ही वाचा : आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती; पिंजऱ्यातील नव्हे: चंद्रकांतदादांचा शिवसेनेला चिमटा

संजय राऊत काय म्हणाले होते.  

संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र नोदी यांचे कौतूक करत ते देशातील सर्वात मोठे नेते असल्याचे म्हटले होते. तर मोदींमुळेच गेल्या ७ वर्षापासून भाजपला यश मिळत असल्याचे सांगितले होते.  

शरद पवार काय म्हणाले होते? 

शिवसेनेसोबत आपण याआधी कधी काम केले नाही. मात्र, महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचे सरकार आले त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला मात्र, काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर या निवडणुकीत इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवता पाळला, असे पवारांनी सांगितले. 

हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या घड्याळातील काटा हा दहा वाजून दहा मिनिटांवरच का?

त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने १९७७ मध्ये भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही, असे शरद पवार म्हणाले. हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नसल्याचे पवार म्हणाले होते.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख