मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे यांची जवळीक वाढल्याची चर्चा आहे. त्यातच आज भाजपचे नेते व आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप-मनसे युतीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
प्रसाद लाड व राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास पाऊन तास चर्चा झाली. कृष्णकुंजवरुन बाहेर येताच लाड यांनी भाजपचा निर्धार, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा, अशी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्यासोबतची ही भेट वैयक्तीक होती, असे लाड म्हणाले. माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तीक संबंध आहेत. असही लाड यांनी सांगितलं.
भाजपची सत्ता आणण्यासाठी जे जे शक्य आहे, ते करू युतीबाबत प्रश्नावर योग्य वेळ आल्यावर बोलूच, राज ठाकरे यांना लागण्याने मी पाहायला आलो असल्याचे लाड म्हणाले.
भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी जे लोक येतील त्यांना आम्ही सोबत घेतणार असल्याचे सांगत लाड यांनी मनसेबाबत सूचक वक्तव्य केल आहे. भाजपचा झेंडा महापालिकेत फडकेल हे मी तुम्हाला आता सांगतो असा निर्णधार लाड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यासाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचं ‘भाजप येणार, मुंबई घडवणार’हे घोषवाक्य जाहीर केलं आहे.
मेट्रोची सर्व कामे आरेकारशेडमध्येच होऊ द्यावीत
कांजूरमार्गाची जागा ही केंद्र सरकारची असल्याचं सांगितलंय, बालहट्टामुळे मुंबईच्या जनतेवर अन्याय करण्याच काम सरकार करत आहे. सरकार ने जनतेच्या हिताच काम केलं पाहिले. निर्णय बदलल्यामुळे मेट्रोचे काम एक वर्ष उशिराने होत आहे. मेट्रोची सर्व कामे आरे काॅलनीमध्ये होऊ द्यावीत. बालहट्ट न करता मुंबईच्या जनतेसाठी निर्णय घ्यावा, असा टोला लाड यांनी ठाकरे सरकारला लगावला.

