ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका...

विविध शासकीय अधिकाऱ्यांपासून खासगी व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे.
 Anil Parab .jpg
Anil Parab .jpg

मुंबई : शिवेसना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात भ्रष्ट्राचाराची तक्रार झाल्यानंतर भाजपने परब यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच भाजप आमदार नितेश राणे (Nilesh Rane) यांनी कोकणी भाषेत परबांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (BJP MLA Nilesh Rane criticizes Anil Parab)

त्या संदर्भात नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे, त्यामध्ये ते म्हणाले की ''ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका..उगाच उद्या "इज्जत" जावुक नको..! आजच उरलीसुरली "लाज" वाचवा...आयकतास ना..!! अशी कोकणी भाषेत टीका राणे यांनी केली आहे. 

प्रकरण काय आहे? 

प्रादेशीक परिवहन विभागात मागील दोन वर्षांपासून कोट्यावधींचा भ्रष्ट्राचार होत असल्याची तक्रार नाशिक पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार विविध शासकीय अधिकाऱ्यांपासून खासगी व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणी परिवहन विभागाचे उपसचिव प्रकाश साबळे यांच्यासह अवर सचिव डी. एच. कदम यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांची चौकशी पूर्ण झाली आहे.

निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी उपायुक्त संजय बारकुंड यांच्याकडे तपास देत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या अनुषंगाने मंगळवारी साबळे आणि कदम यांचे जबाब नोंदविण्यात आले. या प्रकरणात गेल्या पाच दिवसांत १२ अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले, तर जबाब व पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलिस उपायुक्त बारकुंड यांना आणखी पाच दिवसांचा अवधी देण्यात आला, तसेच तक्रारीनुसार वेळ भासल्यास ज्यांच्याविरोधात तक्रार आहे त्यांचे बँक व्यवहारदेखील तपासले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com