म्हणून सेनाभवनात पुन्हा सैनिकांचा बंदोबस्त 

राज्य सरकारला हवे असल्यास आमच्या सर्व आमदारांना निलंबित करावे
 Shiv Sena Bhavan .jpg
Shiv Sena Bhavan .jpg

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मनमानी कारभार भारतीय जनता पक्ष कधीच खपवून घेणार नाही. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजप विधानसभेपासून रस्त्यापर्यंत आवाज उठवणार आहे. राज्य सरकारला हवे असल्यास आमच्या सर्व आमदारांना निलंबित करावे; मात्र आमचा ओबीसी समाजाच्या अधिकारासाठी सदैव लढा सुरुच राहील. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. केंद्रापासून खेड्यापर्यंत भाजप नेहमीच ओबीसी समाजाच्या पाठीशी उभी राहील असे मत ,मुंबई भाजप (BJP) अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी मांडले आहे. (BJP MLA Mangal Prabhat Lodha's criticism of the state government) 

मुंबईत भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. लोढा यांच्या उपस्थितीत भाजप दक्षिण मध्य मुंबईतर्फे महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भागोजी कीर स्मारक, दादर चौपाटी येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमीळ सेल्वन, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांनी पदाधिकारी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे १२ निलंबित झाले. याचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते शिवसेना भवन परिसरात येण्याची शक्यता असल्याने शिवसेना भवन परिसरात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. अनेक शिवसैनिक शिवसेना भवन परिसरात जमा झाले होते. शिवसैनिकांकडून शिवसेना भवन परिसरात बंदोबस्त दिला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com