Sarkarnaa Banner (53).jpg
Sarkarnaa Banner (53).jpg

ओबीसी नेत्यांचे माकड झाले, मलिदा खाण्यासाठी ते सत्तेमध्ये आहेत का? 

ओबीसी नेते मलिदा खाण्यासाठी सत्तेमध्ये आहेत का, त्यांनी आत्मसन्मान विकला आहे का?

सांगली : ''महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहे. सरकारमध्ये ओबीसी नेत्यांचे माकड झाले आहे. ओबीसी मंत्र्याच्या शब्दाला कवडीची किंमत राहिली नाही,'' अशी  टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.  सांगलीच्या झरे येथे माध्यमांशी ते बोलत होते. BJP MLA Gopichand Padalkar criticizes OBC leaders

''ओबीसी समाजाला दगाफटका करणाऱ्या महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे. महाराष्ट्रमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायती निवडणुकामध्ये सर्व जागेवर ओबीसीचे उमेदवार उभे केले जातील.  फडणवीसांच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज राहील,'' असेही पडळकर म्हणाले.

''जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार नाहीत, अशी भीम गर्जना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या निवडणुका जाहीर झाल्या. या ओबीसी नेत्याच्या शब्दाला मातीमोल किंमत या आघाडी सरकारने केली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे,'' असेही पडळकर म्हणाले.

ओबीसी नेते मलिदा खाण्यासाठी सत्तेमध्ये आहेत का, त्यांनी आत्मसन्मान विकला आहे का? या सर्व प्रश्नावर महाराष्ट्रमधील ओबीसी समाज जागृत झाला आहे.. येत्या 26 तारखेला ओबीसी समाज आपली ताकत दाखवत  या सरकारला जागा दाखवणार असल्याचा इशारा पडळकर यांनी यावेळी दिला.  

नवी दिल्ली :  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तीन तास झालेल्या या चर्चेत प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबतची रणनीती पवारांसमोर मांडली. भाजपला कसे पराभूत करता येईल, याचा आराखडा प्रशांत किशोर यांनी पवारांसमोर सादर केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com