कोरोना विरुद्धच्या लढाईत भाजप आमदाराने थेट दिल्लीतून आणली मदत  

कोरोनाची लाट थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसोत्सवाची घोषणा करताना नागरीकांनी लस घ्यावी आणि सुरक्षित व्हावे असे आवाहन केले होते.
 Atul Bhatkhalkar .jpg
Atul Bhatkhalkar .jpg

मुंबई : कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांमधून राज्य सरकारला साह्य करण्याचे उदाहरण कांदिवली (पूर्व) चे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी केंद्रीय कामगार मंत्र्यांकडे मागणी करून आकुर्ली रोडवरील कारावियो रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु केले आहे. 

हे केंद्र आजपासून सुरु झाले असून सध्या येथे रोज पाचशे व्यक्तींचे लसीकरण होईल. कालांतराने त्याची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न केले जातील. हे केंद्र सुरु होण्यासाठी भातखळकर यांनी दिल्लीत सातत्याने पाठपुरावा केला होता. कोरोनाची लाट थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसोत्सवाची घोषणा करताना नागरीकांनी लस घ्यावी आणि सुरक्षित व्हावे असे आवाहन केले होते. त्यानुसारच हे केंद्र स्थापन झाल्याचे भातखळकर म्हणाले. 

जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी म्हणून सर्वत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. मालाड पूर्व येथील म. वा. देसाई रुग्णालयात यापूर्वीच लसीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आता कामगार राज्य विमा योजना रुग्णालयात दुसरे केंद्र सुरु झाल्याने नागरिकांना लसीकरणासाठी दहिसरला जाण्याची गरज नाही. त्यामुळे दहिसरसाठी सुरू केलेली मोफत बस सेवाही बंद केली आहे, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पक्षभेद बाजूला ठेऊन सर्वांनीच साह्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींनी केले होते. त्यानुसार आपण जनतेसाठी आपल्या परीने हा छोटा प्रयत्न केला आहे. आता राज्य सरकारनेही विनाकारण केंद्र सरकारला दोष न देता आपली जबाबदारी पार पाडावी, अशी प्रतिक्रिया भातखळकर यांनी व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com