शिवसेनेच्या टक्केवारीने घेतला १० लोकांचा बळी

भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज येथील कोरोना रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला.
 Atul Bhatkhalkar, Uddhav Thackeray .jpg
Atul Bhatkhalkar, Uddhav Thackeray .jpg

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज येथील कोरोना रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत, घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमिवर प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. टक्केवारीच्या मोहापायी १० लोकांचा बळी गेला अशी टीका त्यांनी केली. 

भातखळकर म्हणाले, 'शिवसेनेचे निकटवर्तीय असलेल्या PMC बँक घोटाळ्यातील वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच महापालिकेचा भांडुपच्या ड्रीम मॉलला वरदहस्त आहे काय?' मॉलमधील अनधिकृत सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी आहेत', असा आरोप त्यांनी केला आहे. 

''पीएमसी बँकेतील घोटाळ्यात संबंध असलेल्या वाधवान कुटुंबाचा अनधिकृत सनराईझ रुग्णालशी थेट संबंध असून त्याच्यामुळेच शिवसेनेने या रुग्णालयाला ओसी नसताना मंजूरी देण्याची कृपा केली आहे. टक्केवारीच्या मोहापायी १० लोकांचा बळी गेला असल्याचे भातखळकर म्हणाले. 

रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, यामुळे रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असल्याचे सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. 

याचबरोबर, ''मॉलमध्ये रुग्णालया पहिल्यांदाच पाहिले, कारवाई होणार असा इशारा देणाऱ्या महापौर किशोरीताईंनी डोळे उघडे ठेवून मुंबईत एक फेरफटका मारावा, आपल्या नाकाखाली आपल्याच मंडळींनी केलेले असे बरेच उद्योग त्यांना पहिल्यांदाच बघायला मिळतील.'' अशी टिप्पणी भातखळकर यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर केली आहे.

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com