पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजप नेते अडचणीत?  - BJP leaders in trouble over Pooja Chavan's death question mark  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजप नेते अडचणीत? 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 मार्च 2021

टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तिच्या कुटुंबासह बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे.

मुंबई : टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तिच्या कुटुंबासह बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अखिल बंजारा परिषदेचे अध्यक्ष श्याम राठोड यांनी या प्रकरणी वाशिमच्या मानोरा पोलिस ठाण्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेत्या चित्रा वाघ, अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, शांताबाई राठोड यांच्यासह माध्यमांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी तक्रार दाखल केली आहे. मानोरा पोलिसांनी ही तक्रार तपासात ठेवली आहे. 

पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबासह बंजारा समाजाची मागील अनेक दिवसांपासून बदनामी सुरू आहे. यामध्ये भाजप नेते आणि प्रसार माध्यमे रोज बदनामी करीत असल्याने आम्ही त्यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यासाठी मानोरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावेत; अन्यथा बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा श्याम राठोड यांनी या वेळी दिला. 

...तो पर्यंत शेतकऱ्यांची वीज कापणार नाही-अजित पवारांची ग्वाही
 

या संदर्भात मानोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिरीष मानकर यांना विचारले असता त्यांनी ही तक्रार तपासात ठेवल्याचे सांगितले. 

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) पदाचा राजीनामा दिला आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले होते. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून जोरदारपणे केली जात होती. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता. 

काॅंग्रेस नेत्यांमध्ये जुंपली: निवडणुकीतील आघाडीवरुन ज्येष्ठ नेत्याचे टीकास्त्र
 

दरम्यान, पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त झाल्याचे समजते. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच पूजाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालामुळे पूजाच्या मृत्यूच्या किमान मुळ कारणापर्यंत पोचण्यास पोलिसांना मदत मिळाली आहे.  

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे, त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच याविषयीची अधिक माहिती दिली जाईल, असे या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र  सविस्तर शवविच्छेदन अहवाल मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पूजा चव्हाण हिने ७ फेब्रुवारीला मध्यरात्री वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीच्या दुसर्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. या घटनेनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. 

Edited By - Amol Jaybhaye  

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख