Breaking : फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीला - BJP leaders arrives at Raj Bhavan to meet Governor Bhagat Singh Koshyari | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

Breaking : फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीला

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मार्च 2021

गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या अहवालावरून राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

मुंबई : पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीच्या रॅकेटसंदर्भातील अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहसचिवांना दिला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर आज फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याबाबतची मागणी त्यांच्याकडून केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या अहवालावरून राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या अहवालावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. बदली रॅकेटमध्ये सरकारमधील काही मंत्रीही सहभागी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर सत्ताधारी पक्षातीने त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 

शुक्ला यांचा अहवालच कोटा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या. त्यांनी सत्ता स्थापनेवेळीही बेकायदेशीरपणे नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. तर फडणवीस यांनी काल हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे सादर केला. ही संपूर्ण माहिती आणि पुरावे पडताळून सुयोग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहसचिवांनी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

दिले आहे. आयपीएस अधिकारी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने केंद्र सरकार तशी चौकशी करू शकते, असे आपले मत आहे. असे असले तरी याप्रकरणी वेळ आली तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. काल दिल्लीतून परतल्यानंतर आज फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.

विरोधी पक्षांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काही दिवसांपासून केली जात आहे. खासदार गिरीश बापट यांनीही लोकसभेत ही मागणी केली आहे. यापार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

फडणविसांकडील ६.३ GB डेटा राज्यात राजकीय भूकंप घडविणार? 

शुक्ला यांचा अहवाल 25 ऑगस्ट 2020 पासून का दडवून ठेवला, तत्कालिन पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सीआयडी चौकशीची शिफारस केली असताना ती का होऊ दिली नाही. कुणाचे बिंग फुटण्यापासून सरकार घाबरत होते. माझी माहिती आहे की, यातील काही संवाद स्वत: मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ऐकले आहेत. यातील दूरध्वनी संवादाबाबत नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, फडणवीस म्हणाले की, त्यांनी ही प्रतिक्रिया प्रचलित नियमाप्रमाणे अतिरिक्त मुख्य सचिवांकडून परवानगी घेऊनच दिली आहे. 

अशा घटनांनी देशातील सर्वोत्तम पोलिस दलाची प्रतिमा मलिन होते आहे. पोलिसच बॉम्ब ठेवतात, खंडणी गोळा करतात किंवा थेट गृहमंत्र्यांविरूद्ध आरोप करतात. अशी स्थिती महाराष्ट्राने कधीही पाहिलेली नाही. या परिस्थितीतून महाराष्ट्र पोलिस दलाला बाहेर काढावेच लागेल, असे त्यांनी सांगितले.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख